महायुतीचेच काम का करावं ? पहा शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील काय म्हणाले..
अजितदादा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन नंतर संपुर्ण राष्ट्रवादी पक्ष अधिकृत रित्या मिळवला म्हणून शरद पवार साहेबांकडून त्यांना गद्दार संबोधले , खालच्या पातळीवर टीका केली गेली. मात्र ज्या भाजप मधून आलेल्या एकनाथ खडसेंना विधान परिषदेवर निवडून आणून त्यांना आमदार करून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले, मात्र त्याच एकनाथ खडसेंनी सुनेची उमेदवारी मिळविली आणि नंतर तब्येतीची कारणे पुढे करून राष्ट्रवादी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. मात्र आता उघड उघड सुनेचा प्रचार करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे खडसे सांगतात. परंतु तो राजीनामा अजूनही मिडीयाला पाहायला मिळाला नाही.मात्र विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा अजूनही दिलेला नाही.
याच खडसेंविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील माजी आ.सतीश पाटील ,माजी आ.संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांना हकालपट्टीची मागणी करूनही त्यांच्या मागणीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंवर न बोलून जिल्ह्यातील प्रामाणिक नेतेमंडळीच्या या मागणीला केराची टोपली दाखविली हे कमी की काय ? याउलट निवडणुका लोकसभेच्या असताना विधानसभेची उमेदवारी खडसेंच्या कन्येला रोहिणी खडसे यांना जाहीर करून टाकली . त्यामुळे राष्ट्रवादीत खदखद आहे ? तसेच जयंत पाटलांच्या कृतीने मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील व समर्थकांना आपोआप महायुतीकडे ढकलण्याचे काम राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंडळीने केल्याचे सिद्ध होत आहे. मग रावेर लोकसभेच्या उमेदवाराला (श्रीराम पाटलाला) निवडून आणायचे आहे की,ठरवून पाडायचे आहे हा प्रश्न राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना पडलेला आहे ?
१३ मे नंतर जर भाजप ने खडसेंना प्रवेश दिला नाही तर खडसे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सक्रिय होऊन मुलीला आमदार करण्यासाठी पुढाकार घेतील यावरून श्रीराम पाटील यांचा ठरवून पराभव करण्याची आखणी तर होत नाही ना ? एकनाथ खडसेंवर कुठलीही कारवाई न करता शरद पवार व जयंत पाटील मुग गिळून गप्प बसल्याने कूछ तो गडबड हैं ! ,
त्यामुळे या बाबी विचारात घेतल्यास तसेच देशात इंडिया आघाडी कडे पंतप्रधान पदासाठी एकही योग्य चेहरा दिसून येत नाही. परंतु महायुती कडे नरेंद्र मोदींसारखा एकमेव आश्वासक व विकासाची दृष्टी असलेला चेहरा असल्याने महायुतीच्याच मतदान करावे अशी स्पष्ट भूमिका घेवून आ.चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी सांगितले.