Wednesday, November 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

शंकर टेमघरे यांना संत मुक्ताबाई संस्थानचा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार जाहीर

श्री क्षेत्र कोथळी - मुक्ताईनगर येथे या पुरस्काराची घोषणा

Santosh Marathe by Santosh Marathe
June 4, 2022
in महाराष्ट्र, मुक्ताई वार्ता
0
शंकर टेमघरे यांना संत मुक्ताबाई संस्थानचा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

• शंकर टेमघरे यांना संत मुक्ताबाई संस्थानचा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार जाहीर !

• श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर येथे या पुरस्काराची घोषणा

मुक्ताईनगर दि . ३ – श्री संत मुक्ताबाई संस्थान , श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर यांच्या वतीने दिला जाणारा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक शंकर टेमघरे ( पुणे ) यांना जाहीर झाला आहे .
श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर येथे या पुरस्काराची घोषणा श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी केली . मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई यांच्या पालखीने आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे आज प्रस्थान ठेवले या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे आणि विश्वस्त उपस्थित होते.
ॲड पाटील म्हणाले , श्री संत मुक्ताबाई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी सांप्रदायातील एका पत्रकाराला २०१९ पासून ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते . २०१९ चा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांना देण्यात आला होता. त्यानंतर कोरोनामुळे सलग दोन वर्षे या पुरस्काराचे वितरण करता आले नाही .
हा पुरस्कार आषाढी एकादशीच्या दिवशी रविवार दि . १० जुलै २०२२ रोजी दुपारी २ वाजता श्री संत मुक्ताबाई संस्थान मठ , श्री क्षेत्र पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे .
श्री. टेमघरे हे १९९५ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत आहेत. साप्ताहिक शिवतेज, अलंकापुरी , दैनिक लोकसत्ता , देशदूत , ऐक्य , पुढारी , सकाळ या दैनिकांत काम करीत असून संत साहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. १९९६ पासून वारीचे वार्तांकन करीत असून सकाळ वृत्तपत्र व साम टीव्ही वाहिनीवर वारी विशेष मालिकेचे संकल्पना, संशोधन, लेखन करीत आहेत . त्यांनी संत नामदेव महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेमभंडारी आणि ज्ञानभंडारा या पुस्तकांचे लेखन केले आहे .

Previous Post

प्रतापचा पाहाडी आवाज शांत ।।संपूर्ण महाराष्ट्रात निशब्द

Next Post

आमदार चंद्रकांत पाटील धावले अपघात ग्रस्ताच्या मदतीला 

Santosh Marathe

Santosh Marathe

Next Post

आमदार चंद्रकांत पाटील धावले अपघात ग्रस्ताच्या मदतीला 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group