महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात मतदारांची दिसून आली निराशा, मतदानाचा टक्का घसरला !
खालील लिंक वर क्लिक करून थेट आपल्या मुक्ताई वार्ता YouTube Channel ला भेट देवून चॅनल सबस्क्राईब करून विविध न्युज व माहितीपूर्ण व्हिडिओ चा आनंद घ्यावा ही विनंती.
महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. कारण मतदार राजाने मतदानाकडे सपशेल पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यामुळे जे उमेदवार निवडून येतील ते अतीशय कमी मतफरकाने निवडून येतील. यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांमध्येही धाकधुक आहे. आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने मतदानावर परिणाम झाला आहे. तसेच महाराष्ट्रात राजकीय धुरळाच एवढा उडाला आहे की मतदारही पाठ फिरवू लागले आहेत.असे चित्र झालेल्या मतदानाच्या टक्के वारी वरून दिसून येत असून उर्वरित ठिकाणी तरी मतदानाचा टक्का वाढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खालील तक्ता पहा