पंकजा मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज
भारती जनता पक्षाच्या वतीने बीड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी आज दि.२४ एप्रिल २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ धनंजय मुंडे, भगिनी व कुटुंबीय आणि इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
मात्र राज्य पातळीवरचा भाजपतील एकही बडा नेता, पंकजा मुंडे यांचा अर्ज भरतेवेळी उपस्थित नव्हता. अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंनी स्वगृही कुलदेवतेची पूजा केली. त्यानंतर आईचे आशीर्वाद घेवुन मुंडे भगिनींनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांची विधीवत दर्शन घेतलं. तसंच गोपीनाथ गडावर जाऊन, गोपीनाथ मुंडेंच्या समाधीपुढे त्या नतमस्तक झाल्या. अर्ज भरल्यानंतर पंकजांनी मोठी रॅली काढत शक्तिप्रदर्शन केलं. बीडमध्ये पंकजा यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणूक लढवत आहे.