शिवसेनेच्या मुख्य बॉडीमध्ये प्रथमच मुस्लिम चेहरा चमकला !
हिंदूहृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने ,शिवसेना पक्षाच्या रावेर लोकसभेतील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून यात, श्री. आरिफ आझाद यांची शिवसेना जळगाव उपजिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली असून अल्पसंख्यांक आघाडी वगळता त्यांची मुख्य शिवसेना बॉडीत नियुक्ती झालेली ते पहिला मुस्लिम चेहरा ठरले आहेत.
आरिफ आझाद हे अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष आमीर साहेब यांचे निकटवर्तीय होते. मध्यंतरी त्यांनी आ.चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खडसेंना कायमची सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व, मतदार संघात दांडगा जनसंपर्क असलेले आरिफ आझाद यांना शिवसेना पक्षाच्या जळगाव उपजिल्हा समन्वयक पदाची धुरा देण्यात आलेली असून शिवसेना वाढीसाठी त्यांचां खूप मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
नियुक्ती बद्दल आ.चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक सुनील पाटील , आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.