नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या नुकसानी पोटी मदत जाहीर – आ.चंद्रकांत पाटील
Aid announced for damages in November 2023 – A. Chandrakant Patil
नोव्हेंबर 2023 मध्ये नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांचे नुकसान भरपाई पोटी मदत जाहीर करण्यात आलेली असून यासंदर्भात शासन परिपत्रक देखील जाहीर करण्यात आल्याची माहिती आ.चंद्रकांत पाटील यांनी दिली.
MlA. Chandrakant Patil informed that in November 2023, aid has been announced as compensation for the loss of farmers and a government circular has also been announced in this regard.
- त्यानुसार शासन निर्णय -शासन निर्णय क्रमांक : सीएलएस-२०२३/प्र.क्र.२७२/म-३,दि.१ जानेवारी २०२४ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ नुसार नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.तरी ज्या शेतकरी बांधवांचे नोव्हेंबर २०२३ मध्ये नुकसानीचे पंचनामे झालेले असतील त्यांनी संबंधित गावचे तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांचे कडे आपले आधार कार्डची झेरॉक्स प्रत येत्या 2 दिवसात जमा करावी जेणे करून नुकसान भरपाई मिळण्यास तात्काळ मदत होईल.
वाढीव मदत पुढील प्रमाणे
जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत :- आधी रु.८,५००/- प्रति हेक्टर, २ हेक्टरच्या मर्यादेत ती वाढवून रु.१३,६००/- प्रति हेक्टर ३ हेक्टरच्या मर्यादेत
बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत :- आधी रु.१७०००/- प्रति हेक्टर, २ हेक्टरच्या मर्यादेत ती वाढवून रु.२७,०००/- प्रति हेक्टर, ३ हेक्टरच्या मर्यादेत
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत :-आधी रु.२२,५००/- प्रति हेक्टर, २ हेक्टरच्या मर्यादेत ती वाढवून रु.३६,०००/- प्रति ३ हेक्टरच्या मर्यादेत
तरी शेतकरी बांधवांनी शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.