बोदवड ता.बोदवड येथे R.T.O कॅम्प तात्काळ सुरु करा – आ.चंद्रकांत पाटील
बोदवड हा स्वतंत्र तालुका असून या तालुक्याला सुमारे ५२ गावे जोडलेली आहे. मागील काळात बोदवड ता. बोदवड येथे परिवहन विभागाचे शिविर (R.T.O Camp) दर महिन्याला भरत होते. परंतु गत काही काळापासून सदरील परिवहन विभागाचे शिबीर (R.T.O Camp) घेतले जात नसल्याने बोदवड तालुक्यातील हजारो नागरिकांचे चार चाकी, दुचाकी, तीन चाकी चालक परवाना, वाहन परवांना व इतर तत्सम महत्वपूर्ण दाखल्यांसाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे.
त्यामूळे बोदवड ता. बोदवड येथे परिवहन विभागाचे शिबिर (R.T.O Camp) पूर्ववत सुरु करणे संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व लागलीच याच महिन्याची तारीख देवुन बोदवड येथे R.T.O Camp घेण्यात यावा अशी मागणी आ. चंद्रकांत पाटील यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी , जळगाव यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
Start R.T.O Camp at Bodwad immediately – MLA.Chandrakant Patil
Bodwad is an independent taluka and about 52 villages are attached to this taluka. In the past, Bodwad R.T.O Camp of Transport Department was held at Bodwad every month. But since the R.T.O Camp of the said transport department has not been conducted for some time now, the four wheeler, two wheeler, three wheeler driver’s license, vehicle license and other similar important documents of thousands of citizens of Bodwad taluka.
Therefore, Bodwad Request that immediate action should be taken regarding resumption of R.T.O Camp of Transport Department at Bodwad and R.T.O Camp should be held at Bodwad immediately by giving the date of this month.