मुक्ताईनगर शहरात मिशरुढ न फुटलेली गुंडगिरी काढतेय वर डोके !!
पोलिस प्रशासनाचा धाक नसल्याची ओरड !!
मुक्ताईनगर : आदिशक्ति संत मुक्ताई साहेबांच्या पद स्पर्शाने पुनीत झालेल्या संत भूमी मुक्ताईनगरीत गेल्या काही दिवसांपासून भर रस्त्यावर मोबाईल हिसकावणे, तसेच इतर चोरीच्या घटनात वाढ झालेली असून याचा बंदोबस्त करणेसाठी पोलिसांसमोर मोठे आवाहन निर्माण झालेले असताना , एक नवीन समस्या मुक्ताईनगर शहरात डोके वर काढू पहात आहे.
ती म्हणजे गेल्या दोन आठवड्यात किरकोळ कारणावरून गृप गँगवार शहरात होताना दिसून येत आहे. विशेष मागील महिन्यात देखील विद्यार्थ्याला अभ्यासावरुन हटकल्याने शिक्षकालाच मारहाण व यानंतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे संबंधितांवर व त्यानंतर आता पुन्हा आठ ते दहा टवाळखोर मुलांचा ग्रुप जमवून एखाद्याला एकातंतात गाठून हाणामारीचे प्रकार होत आहेत , बस स्थानक, प्रवर्तन चौक ते शाळा कॉलेज अशा परिसरात या गंभीर घटना होताना दिसू येत असून अगदी मिशरुढ हि न फुटलेली ही गुंडगिरी डोके वर काढून भविष्यातील मोठ्या गुन्हेगारीचे चित्रच येथे डोळ्यासमोर उभी करताना दिसून येत असून अशा शिक्षणाची कास सोडून विद्यार्थी दशेतील मुले गुन्हेगारी कडे वळत असताना पोलिस प्रशासन करतेय काय ? अशा विद्यार्थी दशेतील नवतरुणांकडे पालकांचे देखील दुर्लक्ष झालेले आहे की काय ? असा सवाल उपस्थित होत असून अशा भरकटनाऱ्या तरुणांचा स्वतःची राजकीय पोळी शेकनाऱ्या राजकारण्यांनी देखील भानावर येवून तरुणाईला गैर मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा भविष्य तुम्हाला देखील माफ करणार नाही अशी सर्व सामान्य नागरिकांत चर्चा आहे.
पोलिश प्रशासनाने कठोर पावले उचलून शहरात कायदा सुव्यवस्था निर्माण करावी अशी मागणी होत आहे.
बस स्थानकात पोलिस कर्मचारी का नाही ?
आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांचे तिर्थक्षेत्र असल्याने येथे वारकरी, पर्यटक तसेच शहर हे महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमा रेषेवरील असल्याने येथे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते तर त्यातच राज्य शासनाने महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत दिल्याने प्रचंड गर्दी असते अशाच येथे बस मध्ये चढताना महिलांचे मंगळपोत व इतर दागिने चोरीस जाण्याच्या घटना नेहमी घडतं असतात तसेच मिशरुढ न फुटलेल्या गुंडांची हाणामारी प्रकरणे येथे नेहमी होत असल्याचे दिसून येत असून महिला तसेच गाव खेड्यातील विद्यार्थिनींना भविष्यात हे बस स्थानक असुरक्षित होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत असून या बस स्थानकात कायम स्वरुपी पोलिस कर्मचारी असणे आवश्यक असताना येथे पोलीस कर्मचाऱ्याची ड्युटी का नाही ? असा सवाल उपस्थित होत असून येथे तात्काळ महिला पोलिस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात यावी अशी मागणी होत आहे.