संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा
मुक्ताईनगरीत भव्य वारकरी संप्रदाय दिंडी स्पर्धा
97भजनी मंडळ सहभाग घेणार
दि.२३ जुलै रोजीचे लागले सर्वांना वेध
मुक्ताईनगर. श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथून 2 जून पासून आषाढी वारी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली आई साहेबांची पालखी रविवारी दि. 23 रोजी स्वस्थळी आगमन करीत आहे त्यानिमित्य भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेच आयोजन करण्यात आलेले असून पालखी सोहळ्याची स्वागताची जय्यत तयारी विविध समितींच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
शेकडो वर्षाची परंपरा जोपासत वारकरी संप्रदायातील मानाचा संत मुक्ताई पालखी सोहळा मुक्ताईनगर ते पंढरपूर व परत मुक्ताईनगर प्रदीर्घ प्रवासानंतर उद्या रविवारी मुक्ताईनगरीत दाखल होणार आहे त्यानिमित्त नवीन मंदिर ते जुने मंदिर भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धा बाल पुरुष व महिला अशा तीन गटात होणार असून वेगवेगळे बक्षीसांची लयलूट होणार आहे बालगट प्रथम बक्षीस 5555 दुसरे बक्षीस 3333 तिसरे बक्षीस 2222 राहील. महिलागटामध्ये प्रथम बक्षीस 7777/- दुसरे बक्षिस 5555/- तिसरे बक्षीस 3333/- पुरुष गटामध्ये प्रथम बक्षीस 11111/- दुसरे बक्षीस 7777/- तिसरे बक्षीस 5555/- असून प्रत्येक सहभागी भजनी मंडळास प्रोत्साहन पर बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे बालगटात 9 दिंड्या महिला गटात 51 जिल्ह्यात पुरुष गटात 37 दिंड्याचे भजनी मंडळ सहभागी होणार आहेत.परिक्षक ह.भ. प. दिपक महाराज पाटील रेलकर ह.भ. प. राजेश महाराज महाजन बुरहानपुर व ह.भ.प. श्रीराम महाराज जामनेर हे राहणार आहेत.
नवीन मंदिर येथून सकाळी दहा वाजता स्पर्धेला सुरुवात होऊन मुख्य रस्त्याने बस स्टॅन्ड परिवर्तन चौक साई चौक गजानन महाराज मंदिर आस्थानगरी मार्गे जुने मंदिर येथे सोहळा समारोप होईल. स्पर्धेचे बक्षीस वितरण काल्याचे किर्तनानंतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.
*एकलाख पोळ्या संकलीत करणार*
भाविकांसाठी मुक्ताईनगर पंचक्रोशीतील गावागावातून एक लाख पोळ्या संकरित करण्यात येणार आहे पाच क्विंटल तूर डाळीची मिरची भाजी दहा क्विंटल रवा शिरा महाप्रसाद बनवण्यात येणार आहेत भाविकांना महाप्रसाद वाटपाचे नियोजनासाठी500 सेवेकरी नोंदणी करण्यात आली आहे यात विविध स्वयंसेवी संस्था मंडळ हिरीरीने सहभाग देणार आहेत
पालखी मार्गात पताका, तोरणे, स्वागत कमानी उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे भाविकांनी आगमन पालखी आगमन सोहळ्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन पालखी सोहळा स्वागत समिती पंचक्रोशीतील गावकरी मंडळी संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर यांनी केले आहे.
या भजनी मंडळांनी केलेली आहे नोंदणी