Screenshot_2023-07-11-18-03-56-40_92460851df6f172a4592fca41cc2d2e6
आदिशक्ति संत मुक्ताई पालखी सोहळा २३ जुलै रोजी स्वगृही परतणार !
ग्रामस्थांनी केले स्वागताचे नियोजन
वारकरी दिंडी स्पर्धा रंगणार , संत भूमीत भक्तीचे नव चैतन्य येणार !
मुक्ताईनगर – आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान कोथळी- मुक्ताईनगर समाधीस्थळ येथून सालाबाद प्रमाणे आषाढीएकादशी निमित्त दि.2 जून 2023 रोजी भुवैकूंठ पंढरीला  गेलेला संत मुक्ताई पालखी सोहळा दि. 23 जुलै  2023 शनिवार रोजी भक्तीमय वातावरणात स्वस्थळी मुक्ताईनगरीत आगमन करणार आहे.
 *येती वारकरी ! वाट पाहातो तोवरी !!*
*घालूनिया दंडवत ! पुसेन निरोपाची मात*
*तुका म्हणे येती ! जाईन सामोरा पुढती !!*
  महाराष्ट्रात सात संतांच्या मांदीयाळीत मानाची संत मुक्ताई पालखी सावळ्या विठूरायाची भेटीसाठी वारकरी लवाजमा घेवून 2 जून 2023 रोजी मुक्ताईनगर समाधीस्थळ येथून प्रस्थान ठेवलेली  पालखी  52 दिवसांचा व 1350 किमी प्रवास करून  स्वस्थळी आगमन करणार आहे भु वैकुंठ पंढरीला गेलेली आई परतणार असल्याने मुक्ताईनगर कोथळी सालबर्डी गावकरी प्रचंड उत्साहीत असून
मुक्ताईनगरीत  ठिकठिकाणी स्वागत कमानी, तोरणे, ध्वजपताका, स्वागतफलक , रांगोळ्या काढण्यात येणार आहे.  तसेच चौकाचौकात पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे.
दिंडीस्पर्धा करिता शंभरहून अधिक येणाऱ्या भजनी दिंडीतील वारकरी भाविकांची गैरसोय होवू नयेत म्हणून काल दि.10 जुलै 2023 सोमवार रोजी मुळ मुक्ताई मंदीर येथे रात्री ८ वाजता संत मुक्ताई पालखी सोहळा स्वागत समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली व  या बैठकीत साधक बाधक चर्चा करून नियोजन करण्यातच ठरविण्यात आले. पालखी मार्गात ठिकठिकाणी चहा, दुध ,फळे, बिस्किट वाटपासह जुने व नवे मंदिरात महाप्रसाद भोजनाची व्यवस्था लोकवर्गणीतून ग्रामस्थांतर्फे करण्यात येणार आहे.  गावातील प्रत्येक घराघरातुन पोळ्या एकत्र करण्यात येणार आहेत  याकामी सर्व सेवाभावी संस्था समाज मंडळ संघटना ग्रुप  संपूर्ण गावकरी, विविध राजकीय पक्ष हिरीरीने सहभागी होणार आहेत.
 शहरातुन मुख्य मार्गाने मुक्ताई चौक ,बस स्टॅंड ,साई चौक, भुसावळ रोड,गजानन महाराज मंदिर मार्गे जुने मंदिर कोथळी येथे दुपारी 3 वाजेपर्यंत पालखी सोहळा पोहोचेल. तेथे हभप. रविंद्र महाराज हरणे पालखी सोहळाप्रमुख  यांचे काल्याचे किर्तन व पायी वारकरीना संस्थान तर्फे कपडे देऊन सत्कार ,तसेच परिक्षक स्पर्धा निकाल घोषित करून मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण कार्यक्रम  होईल.
सोहळा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ मंडळी सालबर्डी कोथळी मुक्ताईनगर परिश्रम घेत आहे.तरी भाविकांनी पालखीआगमन सोहळा उत्सवासाठी तन ,मन ,धनाने उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.
पालखी सोहळ्याचे स्वागत  प्रसंगी निधी संकलन समिती नेमण्यात आलेली असून वस्तू किंवा रोख स्वरूपात दान द्यायचे असेल, तर खालील निधी संकलन समिती मधील सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पालखी सोहळा उत्सव समिती तर्फे करण्यात आलेले आहे.
श्री. उद्धव महाराज जुनारे-
      9975172759
श्री. पुरुषोत्तम भाऊ वंजारी
       9579254777
 श्री. विशाल भाऊ सापधरे
       9423489472
 श्री.निवृत्ती भाऊ पाटील
       9422294047
 श्री.श्रीकांत भाऊ पाटील
      9673335718
 श्री.स दा भाऊ पाटील
      7385394041
 श्री. ह भ प पंकज महाराज
      7498913276
 श्री.डॉ.विक्रांत जयस्वाल
      9922202027
 श्री.उमेशभाऊराणे,कोथळी
      9765723619
 श्री.पवन भाऊ सदावर्ते
      9730456759
error: Content is protected !!