शुक्रवारी दि.२३ जून रोजी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
जिल्हा प्रशासनाकडून स्वागताची जय्यत तयारी
बार्शी श्री संत मुक्ताबाई समाधी समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथून दोन जून रोजी प्रस्थान झालेली मानाची आषाढी वारी संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रवास अंतिम टप्प्यात असून उद्या दुपारी सोलापूर जिल्ह्यातील वारदवाडी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे यावेळी शासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांताधिकारी त्यांची खास नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केलेली असून बार्शी तालुक्यातील वारदवाडी येथे पालखी सोहळा दुपारी बारापर्यंत पोहचताच भव्य स्वागत करण्यात येणार आहे .स्वागतानंतर शेंद्रि ता.बार्शी ,गावी पालखी सोहळ्याचा मुक्काम राहील.