दारुड्यांचं संताप जनक कृत्य
*संत मुक्ताई मंदिराच्या मार्गावर दारूच्या बाटल्यांचा सडा !*
सविस्तर वाचा_____👇
मुक्ताईनगर : आदिशक्ती संत मुक्ताई समाधी स्थळ जुनी कोथळी – मुक्ताईनगर येथे मुळ मंदिरात आदिशक्ती संत मुक्ताई मंदिरात ७२५ व्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त गेल्या वर्ष भरापासून अखंड कथा किर्तन , पारायण व नाम जप सेवा सुरू असून या सप्ताहाचा कळस सप्ताह पर्व येथे सुरू असून पंढरपूर , कौडीण्यपुर, त्र्यंकेश्वर आदी मानाच्या पालख्या व जळगांव विदर्भ, तसेच मध्यप्रदेश आदी परिसरातून मुक्ताई वर श्रद्धा असलेल्या लाखो भाविकांच्या पायी दिंडी सोहळे येथे येण्यासाठी मार्गस्थ झालेले असून अगदी पवित्र मय वातावरण येथे निर्माण झालेले आहे. अशा परिस्थिती मध्ये तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे भाविकांचे मोठ्या उत्साहात स्वागत होणे अपेक्षित आहे. नव्हे नव्हे शहरातील मुख्य मार्ग असलेल्या उघड्यावर होत असलेली मांस विक्री बंद करावी व हि मांस विक्री दर एकदशिला बंद रहावी अशी सहिष्णू वारकरी संप्रदायाच्या भावनांचा विचार करता होत आहे. यावर पालिकेने पोलिस प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित असताना आता आणखी एक संताप जनक प्रकार आढळून आला असून दररोज रात्रीचे कीर्तन आटोपल्यावर भाविक व वारकरी घराकडे मार्गस्थ होत असताना संत गजानन महाराज मंदिराकडून जाणाऱ्या मार्गावर आस्था नगरी च्या N A परीसरातच संत मुक्ताई मंदिराच्या मार्गावरच शहरातील काही दारुड्यानी बैठका सुरू केल्या असून एकीकडे “कीर्तनातून संत विचारांची शिदोरी घेवून भाविक घराकडे परतत असताना दारुड्यांची करणी मात्र डोळ्यांनी पहावी लागत असल्याने वारकरी व भाविकात संताप व्यक्त होत असून दारुड्यांना आता बियर बार च्या जागाच कमी पडू लागल्या असून संत मुक्ताई मार्गही भ्रष्ट करण्याचे त्यांचे या कृत्याला पोलिस किंवा तत्सम प्रशासन लगाम लावेल का अशा संतप्त भावना व्यक्त होत आहे.
**********************
बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून भावी पिढी सुसंस्कारी व्हावी यासाठी शहरातील भाविक व वारकरी त्यांच्या बाल गोपालांसह मुक्ताई मंदिरावर नामांकित कीर्तनकारांची कीर्तने एकण्यासाठी येथे येत असतात, मात्र घरी माघारी परतत असताना उघड्यावरील दारुड्यांचे संतापजनक कृत्य पाहून सोबत आणलेल्या लहान बालकांचे डोळे अक्षरशः झाकावे लागतात इतका गंभीर चिंतनीय विषय या मार्गावर दिसून येतो एरव्ही सोशल मीडियात ज्ञानाचे डोस पाजणारेच इथे असा संतापजनक प्रकार करत असतील तर सोशल मीडिया मध्ये मीच किती श्रेष्ठ असा भासवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न याबद्दल नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगलेल्या आहे.














