अमिताभ बच्चन यांनी दिल्या ट्विटर वरून संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्याच्या शुभेच्छा !
बॉलीवूड चे सुपर स्टार सदीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्या ट्विटर वरून आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त वारकरी व भाविकांना शुभेच्छा दिल्या असून त्यांनी दिलेल्या शुभेच्छा पोष्ट मुळे ते महाराष्ट्रातील संत परंपरे बद्दल किती जागरूक आहेत हे यावरून दिसून आले. तसेच त्यांनी Tweet करताना आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांचा मुक्ताई नगर येथील नवीन मुक्ताई मंदिरातील फोटो शेअर केलेला असून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताई समाधी स्थळ (कोथळी) मुक्ताईनगर येथे अंतर्धान झालेल्या होत्या हा दिवस मुक्ताईनगर वारकरी व संत परंपरेनुसार भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येत असतो.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा देवून मुक्ताई प्रति श्रद्धा दाखविली असल्याने आई मुक्ताई साहेबांचा त्यांना आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना मुक्ताई वर श्रद्धा असलेल्या भाविकांतर्फे व्यक्त होत आहे.तसेच त्यांच्या शुभेच्छा पोस्ट सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने मुक्ताई वार्ता तर्फे दाखल म्हणून वाचकांसाठी बातमी व माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे .तर आपल्याला अमिताभ बच्चन यांच्या जागरूकते बद्दल काय वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही विनंती