Muktainagar News: संत मुक्ताई-चांगदेव माघवारी यात्रोत्सवास ध्वज पूजनाने आरंभ!

muktai yatra

Muktainagar News: वारकरी संप्रदायासह पंचक्रोषीतील भाविकांसाठी अत्यांत महत्त्वाची अशी श्री क्षेत्र संत मुक्ताईनगर-चांगदेव माघवारी महाशिवरात्री (Mahashivaratri Date) यात्रोत्सवास (Muktai Yatra) आज दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता ध्वज पुजनाने सुरुवात झाली. संस्थानचे अध्यक्ष ॲड रविंद्र पाटील यांचे हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले.

[metaslider id="6181"]

योगीराज चांगदेव महाराज व संत मुक्ताई भेटीच्या निमित्ताने दरवर्षी माघवारी महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रोत्सव संपन्न होत असतो. विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह मध्यप्रदेश, गुजराथ राज्यातून शेकडो दिंड्यासह लाखो वारकरी भाविक या यात्रोत्सवात सहभागी होतात .दिनांक 15 ते 20 फेब्रुवारी पर्यंत हा उत्सव सुरु राहणार आहे. तत्पुर्वी आज संत मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील व विश्वस्तांच्या हस्ते मुक्ताई ध्वज पूजन करून यात्रोत्सवाला विधिवत सुरुवात करण्यात आली. कोरोना संकटानंतर यंदा मोठ्या उत्सवात व भाविकांच्या प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत ही यात्रा संपन्न होईल. या यात्रोत्सवानिमित्त ठिकठिकाणच्या दिंड्या, पालख्या मुक्ताईनगर कडे मजल दरमजल आगमन करत असून दिंड्यामध्ये भावीकांची संख्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे. यावर्षी दिंड्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे.

ध्वजपुजनाप्रसंगी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, जुनी कोथळी मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव जुणारे महाराज, मासुळे सर, अतुल जावरे आदींसह असंख्य वारकरी व भाविक उपस्थित होते.

यात्रोत्सवासाठी तयारी पूर्ण

यात्रोत्सव काळात भाविकांची गैरसोय ठाळत अधिकाधिक सुविधा देता याव्यात म्हणून नगरपंचायत मुक्ताईनगर, ग्रामपंचायत कोथळी, संत मुक्ताई संस्थान, कोथळी तालुका मुक्ताईनगरतर्फे जय्यत तय्यारी करण्यात आली केली आहे .संपूर्ण परिसरात दिवाबत्ती, पाणीसह अवश्यक त्या व्यवस्था करण्यात आल्या आहे.  यात्रोत्सवासाठी व्यापारी मंडळींनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे.

error: Content is protected !!