Muktainagar News: येथील प्रभाग 7 मधील श्रीरामनगर (भिल्लवाडी) मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील महा आरोग्य शिबीर आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतीताई त्रिलोक मालचे यांनी आयोजित केलेले. या शिबीराचे उद्घाटन आ.चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती सौ.यामिनीताई पाटील व कन्या कु. संजानाताई पाटील यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) व स्व.बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक गटनेता निलेश शिरसाट, नगरसेवक मुकेश वानखेडे , नगरसेवक संतोष मराठे,नगरसेवक संतोष कोळी, गणेश टोंगे , प्रफुल्ल पाटील, छोटू भोई , अफसर खान, वसंत भलभले, राजेंद्र तळेले, सुनील गवते, विजू सावळे, आकाश बोरे, बंडू काळे आदींची उपस्थिती होती.
शिबिरामध्ये “जागरूक पालक सदृढ बालक” या अभियांतर्गत विविध बालक, महिला तसेच नागरिकांचा विविध आजारांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.
यांनी केली तपासणी
वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश पाटील, डॉ राहुल , डॉ प्रवीण बोदडे, डॉ शोएब खान, डॉ पानपाटील, डॉ पल्लवी तळेले, डॉ इम्रान खान, डॉ हेमंत जाधव , अधिपरीचारिका आशा चिखलकर, कल्पना नगरे, प्रियांका राठोड, गावित सिस्टर यांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच बीसीएम प्रतिभा सोनटक्के, बीएफ सुनीता चौधरी, संगीता पंडित, आशा वर्कर आरती वंजारी, सुरेखा मोरे, सुनीता वैद्य, संगीता पगारे, संगीता पाटील, उषा काळे, निर्मला भोलाणे, रुपाली कोळी, पुनम कोळी,मंगला चौधरी आदींचे सहकार्य लाभले.
रक्त तपासणी व मधुमेह तपासणी
हिंद लॅब तर्फे येथे रुग्णांची रक्त तपासणी सह मधुमेह (शुगर) ची तपासणी देखील करण्यात आली.यासाठी हिंद लॅब चे संपूर्ण पथक उपस्थित होते.