Diet Tips: हल्ली धावपळीचं युगात बदलत्या शैलीमुळे आहारात देखील मोठ्या बदल झाला आहे. अनेकांनी आपल्या आहारातून साखर (Sugar) जवळपास बाद केली आहे. मधुमेह आणि वजन कमी (Weight Loss Tips) करण्यासाठी साखरचे सेवन प्रमुख्याने टाळले जाते. पण, आहारातून साखर बाद केल्याने वजन खरंच कमी होत का? तसेच साखर सोडल्याने काय फायदे आणि काय नुकसान होते (Sugar Advantages and Disadvantages) हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती.
चुकीची जीवन आणि आहारशैलीमूळे लोकांमध्ये मधुमेहसह वजन वाढीची समस्या वाढीस येत आहे. यामुळे लोकांनी आहाराकडे लक्ष देत प्रामुख्याने आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला आहे. कार्बोहायड्रेट्स अनेक पदार्थांमध्ये आहे. फळांमध्ये आणि दुधातही याचे प्रमाण जास्त असते. यासह आपण खाता असलेली साखर उसात, बीट आणि मॅपल सिरपमध्ये असते. तर मधात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज अढळतात. हल्ली लोक किटो सारख्या डाएट प्रकाराकडे लोक वळले आहे.
हे आहे फायदे आणि तोटे
आहारात साखरचे सेवन कमी केल्याने काही फायदे आणि काही तोटे आहे. साखरचे कमी सेवन वजन कमी करण्यासाठी फायदे आहे. साखर कमी प्रमाणात खाल्ल्याने शरीरात कमी कॅलरीज जातात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यासह दातांचे आरोग्य देखील सुधारतं. मात्र, साखरेचे सेवन काही समस्यांना तोंड देखील देतात. यात प्रामुख्याने साखर कमी प्रमाणात खाल्ल्याने मूड स्विंग, डोकेदुखी सारख्या समस्या निर्माण होतात. या समस्या का निर्माण होते याचं कारण स्पष्ट नाही. मात्र, ही समस्या किंवा तोटे थोड्या काळासाठी असतात.
साखरचे अति सेवन व्यसन आहे?
पदार्थाची चव वाढविण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारची साखर घातली जाते. साखरचे मेंदूवरही काही परिणाम होतात. हा परिणाम इतका मोठा असतो की, कालांतराने साखरेचं व्यसन लागण्याची शक्यता असते. मुळात साखरेचे व्यसन हा दावा अजूनही सिद्ध झालेले नाही. मात्र हा दावा तपासून पाहिला जात आहे.
खरं तर साखरेत सुक्रोज या घटकामुळे जीभेवरील गोड चवीचे रिसेप्टर कार्यान्वित होत मेंदूतील डोपामाईन नावाचं रसायन तयार होतं. डोपामाईनला Reward chemical असेही म्हणतात. यामुळे मेंदूत आनंद लहरी निर्माण होत काहीतरी छान खायची इच्छा होते. डोपामाईन मेंदूत तयार झालं की स्वत:ला काहीतरी बक्षीस देण्याची इच्छा होते आणि बऱ्याचदा हे बक्षीस साखरेच्या रुपात मिळावं असं वाटतं. दरम्यान, साखर सोडल्यावर डिप्रेशन, काळजी, वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा, मेंदूत थकवा, डोकेदुखी, झोप येणे ही समस्या निर्माण होते. अनेकांना साखर सोडणे आतिशय अवघड ठरतं. या समस्येला साखरेचं व्यसन म्हणणे वादग्रस्त ठरेल. यावर अद्याप सखोल अभ्यास झालेला नाही. मात्र, एखादं व्यसन सोडल्यानंतर जी लक्षणे लक्षणं दिसतात ती लक्षणं या प्रकरणात दिसू लागतात.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत असून muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)