Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Weight Loss Tips: लठ्ठपणावर रामबाण उपाय ठरतो बडीशेप-जिऱ्याचा चहा, असं करा सेवन

Admin by Admin
January 28, 2023
in लाईफस्टाईल
0
Weight Loss Tips: लठ्ठपणावर रामबाण उपाय ठरतो बडीशेप-जिऱ्याचा चहा, असं करा सेवन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Weight Loss Tea: धावपळीच जीवन आणि चुकीच्या आहारशैलीमुळे बहुतेक लोकांना वाढत्या वजनाची (Weight Gain) समस्या जाणवत आहे. वाढते वजन म्हणजेच लठ्ठपणा आरोग्यसाठी घातक ठरतो. यामुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते. वाढत्या वजनाची समस्या दूर करण्यासाठी लोक आहार आणि व्यायाम यासारखे अनेक उपाय (Weight Loss Tips) करतात. तुम्हालाह लठ्ठपणाची समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्या ठरु शकते. या लेखात आम्ही तुम्हाला लठ्ठपणा दूर करण्यासाठी एक घरगुती उपाय (Home Remedy) सांगणार आहोत. या उपायाने तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे तो उपाय.

प्रत्येक स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले आढळतात. मसाले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. यातील काही मसाले असे आहेत जे वजनवाढीच्या समस्येवर रामबाण उपाय ठरतात. याच मसाल्यांपैकी एक म्हणजे बडीशेप आणि जिरे. बडीशेप आणि जिऱ्यामध्ये मानवी शरीराला उपयुक्त असे जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फायबर आढळतात. या दोन मसाल्यांचा चहा प्यायल्याने वाढलेले वजन कमी करणे शक्य होते. या चहामध्ये मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप-जिऱ्याचा चहा प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

हे आहेत फायदे

  • पाचनक्रीयेतील दोषामुळे देखील लठ्ठपणा वाढतो. शरिरातील चयापचय क्रीया सुधारण्यासाठी बडीशेप आणि जिऱ्याच्या चहाचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हा चहा प्यायल्याने चरबी लवकर बर्न होते. तसेच भूकही नियंत्रित राहते. बडीशेप आणि जिऱ्याचा चहाचे रिकाम्या पोटी सेवन लठ्ठपणाची समस्या दूर करण्यास प्रभावी ठरते.
  • शरीर डिटॉक्स म्हणजे दुषित पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी बडीशेप आणि जिऱ्याचा चहा फायदेशीर ठरतो. बडीशेप आणि जिऱ्यातील पोषक तत्व रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. यासह ते शरीरातून यूरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यास ही मदत करतात. यासह बडीशेप आणि जिरे नवीन पेशींच्या निर्मितीसाठी देखील उपयुक्त आहे.
  • बडीशेप-जिऱ्याचा हा चहा सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. बडीशेप अन्न चांगले पचण्यास मदत करते. त्यामुळे जेवणानंतर बडीशेपचे सेवन केले जाते. जर तुम्हाला अपचन किंवा गॅस सारख्या समस्या असतील तर तुमच्या दिनचर्येत बडीशेप आणि जिरे चहाचा समावेश करा.

असा बनवा चहा

लठ्ठपणाच्या समस्येवर रामबाण ठरणारा बडीशेप आणि जिऱ्याचा चहा बनवणे अगदी सोपे आहे. हा चहा बणवण्यासाठी अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर रात्री भिजत ठेवलेले बडीशेप आणि जिऱ्याचे पाणी सकाळी उकळून त्यात गाळून घालून हा चहा प्या. रिकाम्या पोटी रोज असे केल्याने काही दिवसातच शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होईल.

(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)

Tags: Fennel-Cumin TeaFennel-Cumin Tea BenefitsHome RemedyWeight Loss RemedyWeight Loss TeaWeight Loss Tips
Previous Post

Shaniwar Che Upay: शनिदोष दूर करण्यासाठी शनिवारी काळ्या उडीदाचे हे 5 उपाय ठरतात प्रभावी

Next Post

Blood Sugar Diet: तुमच्या रक्तातील साखर वाढली आहे का? मग, आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Admin

Admin

Next Post
Blood Sugar Diet: तुमच्या रक्तातील साखर वाढली आहे का? मग, आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Blood Sugar Diet: तुमच्या रक्तातील साखर वाढली आहे का? मग, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group