What Is Richter Scale: भुसावळ, सावदा परिसरात आज भूकंपाचा (Earthquake) सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर (Richter Scale) याची तीव्रता 3.3 इतकी मोजली गेली. आज आलेला हा भूकंप सौम्य असला तरी सर्वांच्या मनात धडकी ठरला. भूकंपांनंतर अनेकांच्या मनात रिश्टर स्केल म्हणजे काय? असा प्रश्न निर्माण झाला असेलच. तुमच्याही मनात याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली असेलच. तर मग जाणून घेऊया रिश्टर स्केलविषयी (How To Work Richter Scale) माहिती.
![Simply Easy Learning](https://i0.wp.com/muktaivarta.com/wp-content/uploads/2024/05/Blue-and-White-Modern-We-Are-Hiring-Flyer_20240518_215836_0000.jpg?resize=1600%2C1069)
काय आहे रिश्टर स्केल?
रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. आलेला भूकंप किती हानीकारक किंवा प्राणघातक आहे, हे रिश्टर स्केलवर मोजल्या जाणार्या तीव्रतेनुसार ठरतं. भूकंपाची तीव्रता आणि परीणाम त्याच्या खोलीवर निर्भर असते. रिश्टर स्केल मापक 1935 मध्ये अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञ चार्ल्स एफ रिक्टर आणि बेनो गुटेनबर्ग यांनी तयार केले होते. भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफवर उच्च रेषांच्या स्वरूपात दर्शविली जाते. आजच्या आधुनिक युगात भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी अनेक आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञान आहेत, जी भूगर्भीय हालचाली जवळून टिपतात. पण, भूकंपाच्या तीव्रतेची गणना करण्यासाठी रिश्टर स्केलचाच वापर केला जातो.
मध्यम आकाराचे भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केल तयार करण्यात आले होते. या अंतर्गत 3 ते 7 तीव्रतेचे भूकंप मोजण्याची क्षमता यात आहे. यामुळे दोन किंवा अधिक भूकंपांच्या तीव्रतेचा आणि नुकसानीचा अंदाज लावला जात होता. मात्र, आज आधुनिक काळातील सिस्मोग्राफला रिश्टर स्केलनुसार कार्य करण्याइतके विकसित केले असून भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
कोणत्या वर्षी झाला होता सर्वात मोठा भूकंप?
पूर्वी लहान भूकंपाचे मोजमाप शक्य नव्हते. परंतू आता भूकंप मोजण्याच्या तंत्रज्ञानात खूप विकसीत झाले आहे. आधुनिक सिस्मोग्राफच्या मदतीने आता अगदी लहान भूकंपही मोजता येतात. भूकंप मोजण्याच्या पद्धतीत एक पॉईंट म्हणजे जमिनीतून 31 पट अधिक ऊर्जा निर्माण होते. भूकंपाचे मोजमाप करण्याची पद्धत समजून घेण्यासाठी आपल्याला एक उदाहरण समजून घ्याव लागेल. ते असं, पाच तीव्रतेचा भूकंप चार तीव्रतेच्या भूकंपापेक्षा 31 पट जास्त ऊर्जा निर्माण करतो. रिश्टर स्केल मोजण्याची कोणतीही सर्वोच्च मर्यादा नाही. मात्र, 8.6 तीव्रतेपेक्षा जास्त भूकंपांची नोंद झालेली नाही. हा भूकंप आता पर्यंतचा सर्वात जास्त तीव्रतेचा भूकंप मानला जातो. सन 1960 मध्ये दक्षिण अमेरिकन देश चिलीमध्ये 8.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. हा भूकंप रिश्टर स्केलनुसार आतापर्यंतचा सर्वात मोठा मनाला जातो.