Yogi Adityanath : बंजारा समाज हा वीरांचा आहे. देशात प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत बंजारा समाजाने देश आणि धर्मासाठी संघर्ष केला असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. अ. भा.हिंदू गोर बंजारा लबाना नायकडा समाजा कुंभ 2023 च्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी धर्मसभेच्या व्यासपीठावर योग गुरु रामदेवबाबा ,मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शंकाराचार्य सदानंद सरस्वती महाराज (श्री द्वारका शक्ती पिठाचे) ,महामंडलेशवर जनार्धन स्वामी, बाबूसिंग महाराज, गोपाल चैतन्य महाराज, धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, भैय्याजी जोशी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, सर्व कामना पूर्ती ,सिद्धी प्राप्ती साठी कुंभ असतो भारत माताच्या रक्षणासाठी बंजारा समाजाचे व्यापक कार्य आहे. भारतात जन्म घेणे दुर्लभ आणि त्यातच मनुष्य जन्माला येणे दुर्लभ आहे. सनातन धर्म मानवता कल्याण मार्ग प्रशस्त करतो. सनातन धर्म म्हणजे मानव धर्म. प्रतिकूल परिस्थिती बंजारा समाजाचा देश आणि धर्मासाठी संघर्ष मोठा आहे. उत्तर प्रदेशात धर्मातंरण करता येत नाही जर केले तर १० वर्ष शिक्षा लागते. दंगा केला तर चौकात फोटो लागतो , तीन दिवसांनी मालमत्ता सरकार जमा होते. गो हत्त्या होत नाही . जर झाली तर १० वर्षे शिक्षा लागते. आम्ही भेदभाव करत नाही. पण, आमच्या आस्थेशी कोणी खेळत असेल तर ते सहन केले जाणार नाही. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी श्री शंकाराचार्य सदानंद सरस्वती महाराज,श्री शारदा शक्ती पिठ यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतात हिंदू धर्म टिकला तर राष्ट्रवाद टिकेल ,हिंदू आणि हिंदुत्व वेगळे नाही. बंजारा समाजाच्या पूर्वजांनि हिंदू धर्मासाठी त्याग केला आहे, धर्म परिवर्तन करतांना त्यात कोणते दोष पाहिले आणि धर्मांतरित होताना त्या धर्मात कोणती वैशिष्ट्ये पाहिली याचा विचार करावा. देशात चार मठ हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आहेत असे प्रतिपादन केले.
योगगुरू रामदेवबाबा यांनी आपल्या उपदेशात माता – पितामध्ये परमेश्वर बघा , सनातन धर्मात भेदभाव नाही. भेदभाव केला असता तर इसाई एक पाऊलही भारतात टाकू शकले नसते. इस्लामने क्रूरतेने अनेकांना मुस्लिम बनविले. क्रूरतेने मुलींच्या शरीराचे अनेक तुकडे केले आहे. यांना अशा वर्तुणुकीची संधी पुन्हा देऊन नका.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे 25 ते 30 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता. 30 रोजी कुंभाचा सहावा आणि अंतिम दिवस होता. सहा दिवसीय बंजारा कुंभात १२ लाख भाविक सहभागी झाले. कुंभाच्या यशस्वीतेसाठी ७०० ते ८०० संतांनी देशभरातून प्रयत्न केले. ३० तारखेपर्यंत ८ लाख लोकांनी कुंभात भोजन केले तर १० लाख लोक कुंभात युन गेले. ३००० स्वयंसेवक कार्यरत होते.