चेन्नई, 19 मार्च (हिं.स.)। इंडियन प्रिमिअर लीगच्या १८ व्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी अवघे ४ दिवस शिल्लक आहेत. सीएसके संघाने सर्वात आधी आयपीएलच्या सरावाला सुरूवात केली. यावेळी एमएस धोनी चेन्नईत उपस्थित होता. चेन्नईमध्ये दाखल होताच त्याच्या टी शर्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल आहे. टी-शर्ट वरील संदेशावरून धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याची चर्चा होत आहे.
ज्यावेळी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रॅक्टीस कॅम्पसाठी चेन्नईमध्ये दाखल झाला, त्यावेळी त्याच्या टी-शर्टची चर्चा झाली. त्याच्या टी-शर्टवर तो यंदा अखेरचा आयपीएल हंगाम खेळणार असा संदेश असल्याचा नेटकऱ्यांनी दावा केला होता. त्याच्या टी-शर्टवर असलेल्या मॉर्स कोड प्रिंटचा अर्थ आहे, ‘शेवटची एक वेळ’ (One Last Time)असा होता. त्यामुळे धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचा चाहत्यांनी अंदाज लावला.धोनी यावेळी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्याला चेन्नईने यंदा ४ कोटी रुपयात अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात सामिल केले. धोनीसाठी हा शेवटचा हंगाम असल्याची प्रत्येक हंगामात चर्चा होते. पण त्याने आयपीएल निवृत्तीबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.