सिंधुदुर्ग, 3 एप्रिल (हिं.स.)। नद्यांमधील गाळ हा कोकणासाठी फार संकटाचा विषय झाला आहे. त्यामुळे कुडाळ-मालवण मतदारसंघात कर्ली नदीवरील जे क्रिटिकल स्पॉट आहेत, तिथला गाळ काढला जाणार आहे. त्यासाठी “नाम” फाउंडेशन पुढे आले आहे. स्थानिक प्रशासन आणि “नाम” यांच्यात करार झाला आहे. या दोघांनीही हा गाळ काढण्याचे काम हाती घेतले असून हे काम रॉयल्टी फ्री आहे. एवढेच नाही तर १० ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम लवकरच सुरू होईल. पण त्याही पेक्षा ९५ किमी पट्ट्यातही गाळ काढण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्याचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल. केंद्र सरकारकडूनही यासाठी मदत घेतली जाईल, अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.
जलसंपदा व मृद जलसंधारण विभाग आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ तालुक्यात नद्यांमधील गाळ काढणे कामाचा शुभारंभ आज सकाळी आ. निलेश राणे यांच्या शुभहस्ते आंबेडकर नगर कुडाळ येथे झाला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
कुडाळ तालुक्यात पावसाच्या काळात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून गाळ उपसा मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ आज कुडाळ आंबेडकरनगर येथे करण्यात आला. पावसाळ्यात नदी नाल्याना पूर येऊन त्याचे पाणी वस्तीमध्ये शिरते त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो यावर मात करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाळ उपसा मोहीम सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील नद्याच्या गाळ उपसा मोहिमेला आजपासून सुरवात करण्यात आली.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या वर टीका
विनायक राऊत यांनी शासकीय मेडिकल कॉलेजवरून केलेल्या टीकेवर बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, मला विनायक राऊत यांच्या बुध्दीची कीव येते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मेडिकल कॉलेज आणण्याचा प्रस्ताव केला. तयारी नव्हती, काहीही नव्हते, इंफ्रा स्ट्रक्चर नव्हते. केवळ राणेंना टारगेट करण्यासाठी त्यांनी मेडिकल कॉलेज उघडले. त्यानंतर पालकमंत्री होते रवींद्र चव्हाण आणि आता नितेश राणे यांनी मेडिकल कॉलेजला दर्जा आणण्यासाठी सातत्याने मिटिंग घेतल्या. हसन मुश्रीफ जे आता त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांची भेट घेतली. अशी एकतरी मीटिंग यांनी घेतली का ? यांचे मेडिकल कॉलेजला चांगले करण्यासाठी यांचे काँट्रीबुएशन आहे का ? यासाठी यांनी खासदार फंड दिला नाही ना आमदार फंड वापरला नाही. तुम्हाला नैतिक अधिकार काय? या जिल्ह्यात जरी ५० मेडिकल कॉलेज आली तरी एडमिशन फुल होतील. आपण १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात राहतो, सेंट्रलाइझड एडमिशन आहे, हे कोणी तरी शिकवा त्यांना, असा टोला आमदार राणे यांनी लगावला.
वक्फ बोर्ड विधेयकाला उबाठाचा विरोध
उबाठा हा पक्षच दुःखात आहे. वक्फ बोर्डची जमीन कायदेशीर झाली, त्यामध्ये लीगल फॉर्मेट आला हे उबाठाला पचत नाही आहे. वक्फ बोर्ड कायदा झाल्यानंतर बाप मेल्यासारखी उबाठाची स्थिती झाली आहे. त्यांच्याकडून तिच अपेक्षा आहे. तुम्ही एका समाजाचे, धर्माचे लागुनचालन करा पण हा देश कायद्याने चालतो, संविधानाने चालतो आणि संविधानानेच चालणार. प्रत्येकाला येथे कायदा समान आहे. मुसलमांनाना वेगळा कायदा या देशात नाही. कायद्या अंतर्गत तुमच्या जमिनी घ्या, कायद्याच्या चौकाटीच्या बाहेर येथे जमिनी लुटायचा अधिकार कुणालाच नाही, असे आ. राणे म्हणाले.
या तर पाकिस्तानच्या अवलादी !
असुद्दीन ओवीसी यांनी वक्फ बोर्ड विधेयक फाडले यावर बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, बाहेर विधेयक फाडायला काय किंमत आहे ? याच अर्थ हे देशाचे कायदे मानत नाहीत. तुम्ही संविधानाचा अपमान करता आहात. बाबासाहेबांचा अपमान करत आहात. विधेयक फाडताय म्हणजे तुम्ही कॉन्स्टीट्यूनल डॉक्युमेंट फडताय. काही समाजातील लोकांना वाटतेय की आम्ही करू तो कायदा ! कारण काँग्रेसने त्यांना इतके दिवस तेच काम केले. ओवीसी दोन्ही भावांना हा देशच त्यांचा नाही असे वाटते, ते पाकिस्तानचे आहेत. ते पाकिस्तानचे म्हणून मरणार. त्यांना भारताबद्दल काहीच नाही. ते कधी वंदे मातरम, भारत माता की जय म्हणत नाहीत. अशा अवलादी पाकिस्तानच्या आहेत, अशी टीका आ. निलेश राणे यांनी यावेळी केली.