Earthquake Tips: जळगाव जिल्हयातील (Jalgaon News) भुसावळ, सावदा परिसरात आज भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जमिनीच्या पृष्ठभागापासून 10 कि.मी. खाली हा भूकंप (Earthquake) झाला. 3.3 रिश्टर स्केल इतकी तीव्रता असल्याने हा सौम्य तीव्रतेचा हा भुकंप म्हटला जाईल. मात्र, भविष्यात अशी परीस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास काय करावे? आपात्कालीन परीस्थित स्वत:चा जीव कसा वाचवावा? असा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झाला असेल तर ही माहीती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आम्ही तुम्हाला भूकंपाच्या परिस्थितीत काय? करावे या विषयी (Earthquake Tips) माहीती देणार आहोत. चला तर मग जाणून घेवूया अधिक माहती.
भूकंपा दरम्यान अशी घ्या काळजी
तुम्ही जर भूकंपाचा धक्का बसत असताना इमारतीच्या आत असाल तर? घरातील टेबलाखाली, बीमखाली, तुळईखाली, दरवाजाच्या चौकटीखाली, कॉलमजवळ अशा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. दरम्यान, लिफ्टचा वापर करू नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. संबंधीत यंत्रणांना त्वरीत कळवा.
रस्त्यावर असाल तर करा हे काम
तुम्ही रस्त्यावर असताना भूकंप आला तर घाई-गडबड, गोंधळ न करता पटकन मोकळ्या जागेत जा, तसेच उंच, जुन्या आणि सलग असणान्या इमारतीपासून, विजेच्या तारांपासून लांब रहा.
जमिनीवर पडून रहा
भूकंपाची परीस्थिती निर्माण झाल्यास मोकळ्या मैदानात जात जमिनीवर पडून रहा. घरात असाल तर मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. मोकळ्या ठकाणी जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.
खबरदारी म्हणून इमारतीची तपासणी
भूकंप झाल्यास सर्वाधिक धोका जुण्या तसेच जिर्ण इमारतींना असतो. त्यामुळे बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जिर्ण इमारत शक्य असल्यास पाडून नवीन बांधकाम करा किंवा अवश्यक ते नुतनीकरण करा.
सुचनांचे पालन करा
भूकंपदरम्यान, रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा.