कोलकाता, 15 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैथिया येथे होळीच्या दिवशी झालेल्या दगडफेकीनंतर हिंसाचार उसळला. त्यामुळे शहरात प्रचंड तणाव पसरला असून खरबरदारीचा उपाय म्हणून आगामी 17 मार्च पर्यंत या भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अफवा आणि बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी सैंथिया शहरातील किमान 5 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस-ओव्हर-इंटरनेट टेलिफोन सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सतत हल्ले होत असल्याचा आरोप भाजप नेते अमित मालवीय यांनी केला आहे. नंदीग्राम ब्लॉक 2 मधील अहमदाबाद परिसरातील कमालपूर येथील स्थानिक रहिवासी गेल्या मंगळवारपासून नमाज अदा करत होते.
जेव्हा पूजा आणि राम नारायण कीर्तन अखंडपणे सुरू होते. तेव्हा काही लोकांना श्री रामाच्या नावाचा जप सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी तेथे तोडफोड करून मूर्तींची विटंबना केली.बरुईपूर, जाधवपूर आणि मुर्शिदाबादसह राज्यभर अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय पोलिसांनी बंगालच्या काही भागात होळी (डोल पौर्णिमा) साजरे करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. या कठीण काळात भाजप बंगाल त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. आम्ही ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालला दुसरे बांगलादेश बनवू देणार नाही, असा इशारा मालवीय यांनी दिला.