Weight Loss Tips: वाढत वजन ही प्रत्याकासाठी डोकेदुखी ठरत आहे. अपण सडपातळ राहावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे लोक जीवनशैलीत आणि आहारात बदल (Weight Loss Diet) करत. व्यायामाचा मार्ग निवडतात. ऐवढ सर्व करुणही अनेकांचे वजन कमी होत नाही. या मागचं कारण म्हणजे गव्हाची पोळी. हे ऐकूण तुम्हाला कदाचात अश्चर्य वाटलं असेल. मात्र, हा खरं आहे. बहुतेक लोकांना हे माहित नाही की, गव्हाच्या पळीत भरपूर ग्लूटेन (Gluten) असते. ग्लूटेन हे वजन वाढण्यासह अनेक आजार होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे गव्हाची पोळी टाळली पाहीजे. गहू ऐवजी कोणती पोळी खावी हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही माहती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानुसार जाणून घेऊया अधिक माहिती.
ग्लुटेनमुळे वजन वाढतं. त्यामुळे आहारात ग्लुटेन-फ्री पिठाचा वापर केला पाहिजे. यात तुम्ही बाजरी, मका, नाचणी, मल्टीग्रेन पीठ आदीचा वापर करू शकता. या पिठात कॅलरी कमी असल्याने वजन वाढत नाही यासह इतर अनेक आजारांपासून दूर राहणे शक्य होते.
बाजरी
अनेक पोषक तत्वांनी संपन्न असे बाजरीचे पीठ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड जास्त प्रमाणात आढळते. हे पीठ पोटात चिकटत नाही आणि सहज पचते. यामुळे चयापचय क्रिया ठीक राहते आणि वजन वाढत नाही. मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांसाठी बाजरी खूप फायदेशीर ठरते.
मक्याची भाकरी
गव्हाच्या पिठाच्या तुलनेत मक्यामध्ये कॅलरीज कमी असतात, त्यात भरपूर कार्ब आणि प्रथिने असतात. मक्यात लोह, फॉस्फरस, जस्त आणि अनेक जीवनसत्त्वेही मुबलक प्रमाणात असतात. यासह उच्च अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने डोळ्यांना देखील लाभ होतो. यासह मक्याची भाकर कर्करोग आणि अशक्तपणा यांसारख्या रोगांपासून बचाव करते. हे पीठ ग्लुटेनमुक्त असल्यामुळे खाल्ल्यानंतर आतड्यांमध्ये चिकटत नाही
बार्ली
फायबर, कार्बोहायड्रेट, सेलेनियम, तांबे, ट्रिप्टोफॅन प्रोपेन, मॅंगनीज, प्रोटीन, सोडियम इत्यादी अनेक पोषक घटक बार्लीत अढळून येतात. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारात बार्लीच्या पोळीचा समावेश केला पाहिजे. कॅलरीज खूप कमी असल्याने पोट भरलेले राहते.
नाचणी
नाचणीच्या पिठात कोलेस्टेरॉल आणि सोडियम नसते. नाचणीच्या पिठात कॅलरी आणि फॅट नगण्य असतात, याशिवाय यामध्ये डायटरी फायबर, कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, आयर्न भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता कमी होत हृदयविकाराचा धोकाही टळतो.
सत्तू
सत्तूमध्ये भरपूर प्रथिने, फायबर असल्याने ते खायला चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. हिवाळ्यात अनेक जण सत्तूची भाकरी आणि पराठे बनवतात. सत्तूची भाकरी खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि पचनक्रिया चांगली असेल तर चरबी जमा होत नाही.
मल्टीग्रेन पीठ
मल्टीग्रेन पिठ हे वजन वाढच्या समस्येत खूप फयदेशीर ठरतं. यात अनेक प्रकारचे धान्य मिसळले जातात. त्यामुळे तुम्हाला अनेक पोषक तत्वे मिळतात. हृदयविकार, पचन, कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी मल्टीग्रेन पिठाचा लाभ होतो.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत असून muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)