Weight Loss Tea: धावपळीच जीवन आणि चुकीच्या आहारशैलीमुळे बहुतेक लोकांना वाढत्या वजनाची (Weight Gain) समस्या जाणवत आहे. वाढते वजन म्हणजेच लठ्ठपणा आरोग्यसाठी घातक ठरतो. यामुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते. वाढत्या वजनाची समस्या दूर करण्यासाठी लोक आहार आणि व्यायाम यासारखे अनेक उपाय (Weight Loss Tips) करतात. तुम्हालाह लठ्ठपणाची समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्या ठरु शकते. या लेखात आम्ही तुम्हाला लठ्ठपणा दूर करण्यासाठी एक घरगुती उपाय (Home Remedy) सांगणार आहोत. या उपायाने तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे तो उपाय.
प्रत्येक स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले आढळतात. मसाले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. यातील काही मसाले असे आहेत जे वजनवाढीच्या समस्येवर रामबाण उपाय ठरतात. याच मसाल्यांपैकी एक म्हणजे बडीशेप आणि जिरे. बडीशेप आणि जिऱ्यामध्ये मानवी शरीराला उपयुक्त असे जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फायबर आढळतात. या दोन मसाल्यांचा चहा प्यायल्याने वाढलेले वजन कमी करणे शक्य होते. या चहामध्ये मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप-जिऱ्याचा चहा प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
हे आहेत फायदे
- पाचनक्रीयेतील दोषामुळे देखील लठ्ठपणा वाढतो. शरिरातील चयापचय क्रीया सुधारण्यासाठी बडीशेप आणि जिऱ्याच्या चहाचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हा चहा प्यायल्याने चरबी लवकर बर्न होते. तसेच भूकही नियंत्रित राहते. बडीशेप आणि जिऱ्याचा चहाचे रिकाम्या पोटी सेवन लठ्ठपणाची समस्या दूर करण्यास प्रभावी ठरते.
- शरीर डिटॉक्स म्हणजे दुषित पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी बडीशेप आणि जिऱ्याचा चहा फायदेशीर ठरतो. बडीशेप आणि जिऱ्यातील पोषक तत्व रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. यासह ते शरीरातून यूरिक अॅसिड काढून टाकण्यास ही मदत करतात. यासह बडीशेप आणि जिरे नवीन पेशींच्या निर्मितीसाठी देखील उपयुक्त आहे.
- बडीशेप-जिऱ्याचा हा चहा सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. बडीशेप अन्न चांगले पचण्यास मदत करते. त्यामुळे जेवणानंतर बडीशेपचे सेवन केले जाते. जर तुम्हाला अपचन किंवा गॅस सारख्या समस्या असतील तर तुमच्या दिनचर्येत बडीशेप आणि जिरे चहाचा समावेश करा.
असा बनवा चहा
लठ्ठपणाच्या समस्येवर रामबाण ठरणारा बडीशेप आणि जिऱ्याचा चहा बनवणे अगदी सोपे आहे. हा चहा बणवण्यासाठी अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर रात्री भिजत ठेवलेले बडीशेप आणि जिऱ्याचे पाणी सकाळी उकळून त्यात गाळून घालून हा चहा प्या. रिकाम्या पोटी रोज असे केल्याने काही दिवसातच शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होईल.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)