अमरावती, 1 एप्रिल (हिं.स.)
एक कदम मानवता की ओर या अभियाना अंतर्गत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. याकरिता छत्री तलाव भानखेडा रोडवर पाणपोईचे उद्घाटन आ. रवि राणा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व त्यांना चांगल्या पद्धतीने पाणी पिता यावे.
या करिता प्रत्येक झाडाला आ. रवि राणा यांनी जलपात्र बांधले. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांना सुद्धा जलपात्राचे वितरण करत छत्री तलाव भानखेडा रोडवरील दोन्ही बाजुने जलपात्र बांधण्याचे सुद्धा निर्देश दिले. तसेच दरवर्षी एक कदम मानवता की ओर ही भुमिका ठेवुन पशु पक्षी दाना पाणी अभियान या संस्थेचे संचालक महेश मुलचंदानी व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे यावेळी कौतुक केले.
प्रत्येकाने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जागोजागी जंगलाच्या रस्त्याने नागरिकांकरिता व पशु पक्षांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय करावी असा संदेश सुद्धा दिला