Shaniwar Che Upay : नवग्रहांमध्ये शनीला प्रभावाल ग्रह मानले जाते. शनिवारचा दिवस हा शनिदेवाला (Lord Shani) समर्पित आहे. या दिवशी विधिवत शनी पूजन केले जाते. न्यायप्रिय शनिदेव (Shani dev) व्यक्तीच्या चांगल्या कर्माचे चांगले फळ देतात. शनिग्रह (Shani Grah) व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव टाकतो. नकारात्मक प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अशांती निर्माण होते. शनिचा नकारात्मक प्रभाव दूर करायचा असल्यास ज्योतिष शास्त्रात सुचवलेले काही उपाय काले पाहजे. शनिवारी हे उपाय केल्यास शनिकृपा होते सकारात्मक फळ प्राप्त होते.
शनिमंत्राचा करा जप
नवग्रहांचा व्यक्तिच्या जीवनावर मोठा प्रभाव असतो. त्यानुसार, शनीची साडेसाती, शनीची महादशा तसेच शनीच्या अवकृपेमुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. या समस्येवर मात करण्यासाठी शनिवारी ‘ॐ प्रां प्रीं प्राैं स: शनिश्चराय नम:’ या मंत्राचा जप करावा. मान्यता अशी आहे की, या मंत्रासोबत ‘ॐ शं शनिश्चराय नम:’ या मंत्राचा देखील जप करावा. यामुळे संकटापासून मुक्ती मिळत रखडलेल्या कामात यश मिळते.
हे उपाय देखील करा
शनि यंत्राची पूजा – कुटूंबात सुख शांती आणि समृद्धीसाठी शनिवारी विशेषतः शनि यंत्राची पूजा करावी. शनि यंत्राच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर होतात. तसेच सकारात्मक प्रभाव दिसून येतो.
दान- शनिवारी उडदाची डाळ, तेल, लोखंड, पुष्कराज रत्न आणि काळ्या कपड्याचे दान केले पाहजे. हे दान शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक फळ मिळतं.
हनुमानजींची पूजा – ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी भगवान हनुमानजींची पूजा करावी. हनुमानजींच्या पूजेत शेंदूरचा उपयोग करावा. सोबत हनुमान चालिसाचा पाठ करावा.
दिवा लावा- शनिदेवाच्या पूजेसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो. दिवा लावताना मोहरीच्या तेलात तीळ टाकणे फलदायी मानले जाते. त्यामुळे शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत असून muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)