उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
अहिल्यानगर 9 एप्रिल (हिं.स.) :- शेवगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांनी शिवसेना शिंदे गटा मध्ये असंख्य महिलांसोबत मुंबई येथे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वज देऊन प्रवेश केला.यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवगाव शहरात नव्या दमाने शिवसेनेची बांधणी सुरू होणार असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक कार्याला प्रेरित होऊन मोठ्या संख्येने महिला व युवक, युवती शिवसेनेत दाखल होत आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शिवसैनिकांची राहिली असून राज्य सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांचे, युवकांचे व विशेषता महिलांचे प्रश्न सोडवले जात आहे व महिलांना देखील लाडकी बहिणींच्या माध्यमातून सन्मान देऊन सक्षम करण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.शेवगाव सह जिल्ह्यात महिलांची ताकद उभी करून परिवर्तन घडविणार असल्याची भूमिका विद्या गाडेकर यांनी मांडली.तर महिला वर्ग शिवसेनेत मोठ्या संख्येने दाखल होत असून विद्या गाडेकर अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय जीवनात सक्रिय आहे. सर्व समाजामध्ये त्यांचे कार्य सुरू आहे व शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्राची लवकरच महत्वाची जबाबदारी सोपवली जाणार जाण्याची शक्यता आहे. व नवनिर्वाचित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या ध्येय, धोरणाप्रमाणे काम करून पक्ष बळकट करण्याचे काम केले जाणार असल्याचा निर्धार देखील व्यक्त केला.