अमरावती, 8 एप्रिल (हिं.स.)
आज मंगळवार रोजी सकाळी सहा वाजता अमरावती येथील गोविंद पथक पेट्रोलिंग करत असताना अमरावतीकडे भरधाव वेगात येत असलेले बोलेरो पिकप क्रमांक एम पी१९ जीए 4867 या वाहनांमध्ये गोवंश असल्याचा पोलिसांना संशय आल्याने सदर वाहनाला पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला. परंतु वाहनचालकाने भरधाव वेगात वाहन चालवून वाहन पलटी केले. पलटी झालेल्या वाहनात 14 गोवंश कत्तलिकरीता आरोपी घेऊन जात होते.
वाहन पलटी झाल्याने त्यामधील चार गोवंशाचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित गोवंशी जनावरे चारा पाणी व देखके करिता विचोरी येथील गौरक्षन येथे पाठविण्यात आले. कत्तली करिता घेऊन जाणारे आरोपी मध्ये शेख मोसिन शेख रिजवान राहणार धनोडी तालुका वरुड, शेख फारूक अब्दुल गणी राहणार वरुड, व चालक मतीन शेख राहणार लालखडी यांचे विरुद्ध पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे नोंदविले असून सदरची कारवाई गोवंश पथक अमरावती
चे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष तेलंग, पोलीस कॉन्स्टेबल सागर कुरळकर, पोलीस कॉन्स्टेबल भारत कासदेकर, पोलीस कॉन्स्टेबल राजेश कासोटे, चालक किशोर सुने, शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल गजानन तिजारे प्रकाश बिरोले यांनी केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.