रांची , 1 एप्रिल (हिं.स.)।झारखंडमधील साहिबगंज येथे दोन मालगाड्यांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री ३ वाजता घडली आहे. या अपघातात दोन लोको पायलटचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, सीआयएसएफचे 4 जवान जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक मालगाडी रुळावर उभी होती. दरम्यान, त्याच ट्रॅकवर दुसरी मालगाडी आली. यामुळे दोन्ही गाड्या समोरासमोर धडकल्या.या रेल्वे अपघाताची घटना साहिबगंज जिल्ह्यातील बरहेत एमजीआर मार्गावर घडली. ही ट्रेन झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील लालमाटिया येथून पश्चिम बंगालमधील फरक्का एनटीपीसीकडे जात होती.धडकेनंतर कोळशाने भरलेल्या मालगाडीला आग लागली. यावेळी तिथे अनेक बोगी रुळावरून घसरल्या.या अपघातात दोन लोको पायलटचा मृत्यू झाला आहे.तर चार जण जखमी झाले. जखमींमध्ये रेल्वे कर्मचारी आणि सीआयएसएफ जवान आहेत. या सर्व जखमींवर बरहात सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन लोको पायलटपैकी अंबुज महातो हे बोकारोचे रहिवासी होते. तर बीएस मॉल बंगालचे रहिवासे होते. घटनास्थळी प्रशासनाचे पथकही दाखल झाले आहे. अपघात कशामुळे झाला यामागे काय कारण होते याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.ज्या मार्गावर अपघात झाला त्या मार्गावर लालमटिया ते फरक्का पर्यंत कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्या धावतात.