सोलापूर, 29 मार्च (हिं.स.) : सिमकार्डचा क्रमांक सांगून ते तुमच्या नावावर आहे, त्यावरुन व्हॉटसअॅपव्दारे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झालेले आहेत. त्याबाबत दाखल गुन्ह्यात तुम्हाला आमचेकडून Digital Arrest करण्यात आलेली आहे. असं सांगून फसविणाऱ्या टोळीतील दोघांना शहर पोलिसांनी गुजरातेतून अटक केली. धवलभाई विपुलभाई शाह (वय- ३९ वर्षे) आणि हार्दिक रोहितभाई शाह (वय ४३ वर्षे, दोघे रा. अहमदाबाद शहर) अशी आरोपींची नांवं असून उर्वरित ३ आरोपी हे सध्या दुबई येथे परागंदा झाले असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सध्या सोलापूर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथील तक्रारदार यांना ८ नोव्हेंबर २०२४ रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉटसअॅपव्दारे ऑडीओ व व्हीडीओ कॉल करुन, त्यांनी स्वतःला आयपीएस अधिकारी व सीबीआय अधिकारी बोलतो आहे, असे सांगुन, तक्रारदार यांना प्रथम त्यांचे नावाचे एक सिमकार्ड क्रमांक सांगून, ते तुमच्या नावावर आहे, त्यावरुन व्हॉटसअॅपव्दारे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झालेले आहेत. त्याबाबत कुलाबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे, तुम्हाला आमचेकडुन Digital Arrest करण्यात आली आहे.