Terror Threat In Mumbai: देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत एनआयएला धमकीचा ईमेल मिळाला आहे. त्यानुसार, देशातील विविध शहरांना सतर्क करण्यात आले आहे. एनआयएने मुंबई पोलिसांनाही (Mumbai Police) ही माहिती दिली आहे. पोलीस आणि इतर यंत्रणा अलर्टवर असून तपासात करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएच्या ईमेल आयडीवर (Terror Threat In Mumbai) धमकीचा मेल आला होता, ज्यामध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्याने स्वत:चे तालिबानी असल्याचे म्हटले आहे. तालिबान संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार हे घडणार असल्याचा दावा या मेलमध्ये करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यातही आला होती धमकी
यापूर्वी जानेवारी महिन्यात मुंबईत दहशतवादी हल्ल्याची (Terror Threat In Mumbai) धमकी मिळाली होती. एका व्यक्तीने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. 1993 च्या धर्तीवर हे स्फोट घडवून दहशत माजवली जाईल, असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने फोनवर सांगितले होते.
कोण आहे सिराजुद्दीन हक्कानी?
तालिबानचा सर्वात धोकादायक गट म्हणून सिराजुद्दीन हक्कानीची ओळख आहे. सिराजुद्दीन हक्कानी हा हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या पुनरागमनानंतर त्याला गृहमंत्री बनवण्यात आले आहे. यासोबतच तो तालिबानमधील नंबर 2 नेता आहे. तालिबानमध्ये हक्कानी नेटवर्कचा मोठा प्रभाव आहे. अमेरिकन तपास संस्था एफबीआयने हक्कानीच्या ठिकाणाची माहिती देणाऱ्यावर दहा दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.