Shaniwar Che Upay: ज्योतिष शास्त्रात (jyotish tips) नवग्रहांना विषेश महत्त्व आहे. त्यामुळे शनिदेव आणि शनि ग्रहाचे स्थान महत्त्वाचे आहे. शनिदेव देवाला न्यायदेवता म्हटले जाते. ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात. शनी कृपाने जीवनातील अडथळे दूर होत यशाचा मार्ग खुला होतो. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न केले पाहीजे. यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय (Shani Dosh Upay) सांगितले आहे. या उपायांमध्ये काळ्या उडीदाचा उपाय खूप महत्त्वाचा आहे. शनिवारी हे उपाय केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद लाभतो.
करा हे उपाय
- शनिदोषापासून मुक्ती- कुंडलीत शनिदोष असल्यास व्याक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाला काळे उडीद आणि मोहरीचे तेल अर्पण करावे. असे केल्याने शनिदोष दूर होत घरात सुख समृद्धी नांदते.
- 11 शनिवारचा उपाय- आर्थिक प्रगतीसाठी शनिवारी संध्याकाळी उडीदाच्या डाळीचे दोन वडे बनवून त्यात शेंदूर आणि दही टाकून पिंपळाच्या झाडासमोर ठेवा. वडे ठेवल्यानंतर मागे वळून पाहू नका. सलग 11 शनिवार हा उपाय करा. यामुळे सकारात्मक परीणाम दिसून येतील.
- 21 दिवस करा हा उपाय- काळ्या उडदाचे 2 दाणे घेऊन त्यावर दही आणि शेंदूर लावून त्यांना पिंपळाच्या झाडाच्या मुळाजवळ ठेवा. शनिवारपासून सलग 21 दिवस हा उपाय करा. असे केल्याने तुम्हाला भाग्याची साथ लाभेल.
- व्यवसात प्रगतीसाठी – आहे त्या व्यवसायात प्रगती तसेच नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल शनिवारी काही उपाय केले पाहजे. यासाठी तुमच्या जुन्या व्यवसायाच्या ठिकाणाहून एखादी लोखंडी वस्तू घेऊन या आणि नवीन व्यवसायाच्या ठिकाणी ठेवण्यापूर्वी स्वस्तिक बनवा आणि त्या ठिकाणी काळे उडीद ठेवा. या उपायाने व्यवसायात प्रगती होईल.
- कावळ्याला दाणे खाऊ घाला- तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर तुम्ही शनिवारी काळ्या उडदाचे 4 दाणे घेत स्वतःवरून उतरवून ते दाणे कावळ्याला खाऊ घालावे. सलग 7 शनिवार हा उपाय करावा. तसेच तुम्ही काळ्या उडदाची डाळही दान करु शकता.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)