Chanakya Niti: जगातील महान विचारवंतांमध्ये आचार्य चाणक्य (Arya Chankya) यांचा समावेश होतो. त्यांनी कूटनीती, राजकारण, अर्थशास्त्र याशिवाय व्यक्तीच्या व्यावहारिक जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहे. नाते-संबंधावर (Relationship Tips) त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगीतल्या असून त्यांनी आपल्या नातिशास्त्रात सुखी वैवाहिक (Married Life Tips) जीवनासाठी पती-पत्नीच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे या विषयी देखील वर्णन केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अशा पुरुषांना भाग्यवान म्हटले आहे ज्यांच्या पत्नींमध्ये विशेष गुण असतात. चला तर जाणून घेऊया महिलेच्या अंगी असे कोणते विशेष असले पाहिजे, ज्यामुळे त्या महिलेचा पती भाग्यवान म्हणून ओळखला जातो.
संयम
चाणक्य नीतीनुसार ज्या पुरुषाची पत्नी संयमी स्वभावाची असते असे पुरुष खरोखर खूप भाग्यवान असतात. या महिला कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जात पतीसोबत खंबीरपणे उभे राहतात. या महिला योग्य आणि अयोग्य यातील फरक सहज ओळखू शकतात. कोणताही निर्णय संयमाने आणि योग्य प्रकारे घेणे हे त्यांचं वैशिष्ट्य असतं असं चाणक्य नीत सांगते.
चांगली वागणूक
अशी स्त्री जी आपल्या नातेवाइकांमध्ये आणि समाजात चांगले वर्तन करते. सर्वांशी आदराने वागत कुटुंबाला एकत्र ठेवण्यसाठी आणि कुटुंबात गोडवा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते. अशा महिलांच्या घरात ज्येष्ठांचा आशीर्वाद कायम राहतो.
बचत करणारी महिला
पैशांची बचत ही कठीण काळात उपयोगी ठरते. चाणक्य नीतिनुसार ज्याची पत्नी पैशाची बचत करते ते पुरुष भाग्यवान आहेत. कारण ज्या महिलेला पैसे कधी खर्च करायचे आणि पैशांची केव्हा बचत करावी तसेच अनावश्यक खर्च कसा टाळावा हे माहित असते ती महिला परिवाराचा मोठा आधार असते. कारण अशा महिला परिवाराला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका पार पडतात.
चांगले बोलणे
बोलण्यावरून व्यक्तीची ओळख होत असते. गोड बोलणारी व्यक्ती कोणालाही आपलंस करून घेतात. अशा महिला कोणाला दुखावत नाहीत. त्यामुळे त्यांना नेहमी चांगला आशीर्वाद मिळतो. बोलण्यासह या महिलांचे आचरण देखील शुद्ध असते. अशा महिलांचे पती भाग्यवान मानले जातात.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)