येवला, 9 मार्च (हिं.स.)।
‘महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्मिती व्हावी’ अशी भावना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसापासून सतत त्याने असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे सुरक्षित असलेल्या महाराष्ट्र हा भीतीपोटी दडपणाखाली असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. या प्रकरणामुळे अनेक वेळा राज्य सरकारला टीकेचे धनी देखील व्हावे लागले आहे मात्र आता ही भावना बदलावी अशी अपेक्षा सिनेसृष्टीतूनही व्यक्त होत आहे.
मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ह्या कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमासाठी येवला शहरात आल्या होत्या याप्रसंगी त्यांनी आपल्या प्रसिद्ध पांडू चित्रपटातील गाण्यावर ठेका धरत येवल्यातील महिलांना या महिला दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या या प्रसंगी पत्रकारांनी महाराष्ट्रातील महिला सुरक्षा बाबत प्रश्न विचारला असता… ‘मी महिला दिनाच्या कार्यक्रमाला येवल्यात आली असून ही ती जागा आणि वेळ नाही याविषयी मला नक्कीच बोलायला आवडेल तेही वेगळ्या ठिकाणी..! ‘या विषयावर मी थोडक्यात मनोगत व्यक्त नाही करू शकत मात्र महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्मिती व्हावी अशी सदिच्छा..! अशी भावना व्यक्त केली.