अहिल्यानगर दि. 31 मार्च (हिं.स.) :- पारायण केल्याने तसेच त्याचे श्रवण करण्याने माणसाला मोक्ष मिळण्यास मदत होते हरिनामाचा जप फार महत्वाचा आहे, देवाला हरिनामाची भूक आहे,किर्तनामध्ये देवाबद्दल प्रेम आपुलकी, भक्ती असायला हवी. संतांचे विचार आजच्या पिढीकरीता एक आदर्श आहेत. आचार, विचार, उच्चारात भगवंतांच्या नामस्मरणाने एक शक्ती निर्माण होत असते. त्यामुळे आपल्या दैनंदिनीत भगवंतांचे नामस्मरण करावे. श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या स्थापनेपासून या ठिकाणी होत असलेल्या विविध कार्यक्रमाने धार्मिकता वाढत आहे. ही समाजाच्या दृष्टीने सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन हभप गुलाब महाराज खालकर यांचे केले.
नेप्ती येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या 11 वा वर्धापन दिनानिमित्त हभप गुलाब महाराज खालकर यांचे किर्तन झाले. याप्रसंगी नर्मदेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, हभप संजय महाराज महापुरे, संजय जाधव, दत्ता जाधव, माजी नगरसेविका सुवर्णा जाधव, सुरेश जाधव, आदेश जाधव, लक्ष्मी जाधव, आशा जाधव, मंगल जाधव, मिनाताई सत्रे, आनंद सत्रे, कावेरी सत्रे, पुजा सत्रे, हेमंत जाधव, सुरज जाधव, डॉ.अमोल जाधव, प्राजक्ता जाधव, ऋषि जाधव, रवि जाधव आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बाबासाहेब जाधव म्हणाले, गेल्या 11 वर्षांपुर्वी श्री नर्मदेश्वर मंदिराची सर्वांच्या सहकार्याने निर्मिती झाल्याने पंचक्रोशितील भाविकांची मोठी सोयी झाली आहे. वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होत आहे. तसेच अध्यात्मिक कार्यक्रम आम्ही सतत या ठिकाणी राबवित असतो. परंतू यावेळी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त नामवंत किर्तन कार, प्रवचनकारांची सेवा या ठिकाणी होत असल्याने संतांचे विचार यानिमित्त भाविकांच्या कानी पडत आहे. सकाळी मंदिरात लघुरुद्राभिषेक करण्यात आला, त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा, दुपारी किर्तन त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशिती ल नागरिकांनी घेतला. नगर शहरातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी नेप्ती येथील अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.