अमरावती, 25 मार्च (हिं.स.)।
पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी फरार झाल्याची घटना धामणगाव रेल्वे तालुक्यात उघड झाली. याप्रकरणी फरार बंदी भीमराव मारोती अवथरे (४३, रा. हिरपूर, ता. धामणगाव रेल्वे) याच्याविरुद्ध तळेगाव दशासर पोलिसांनी २३ मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल केला. अमरावती कारागृहातील शिपाई मंगेश सोळंके यांनी तक्रार नोंदविली.
अवथरे याच्याविरूध्द सन २०१८ मध्ये खून, पुरावा नष्ट करणे व फौजदारी स्वरुपाचा कट रचणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल होता. २० जानेवारी २०२० रोजी त्याला यवतमाळच्या जिल्हा सत्र न्यायालय तथा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला ती शिक्षा भोगण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले होते. दरम्यान, बंदी भीमराव याने कारागृह प्रशासनाकडे आपल्याला एक दिवसाच्या अभिवचन रजेवर सोडण्यात यावे, असा अर्ज प्रशासनाकडे केला होता. त्यानुसार तो २१ मार्च रोजी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात परतणे गरजेच होत.