ठाणे, 23 मार्च, (हिं.स.)। वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत येऊर येथील गोल्डन स्वन क्लबमधील पूर्वीच्या ब्लॉच हॉटेलच्या नावात बदल करून लेवल अप नावाचे हॉटेल सुरू करण्यात आले आहे. तेथील, अंदाजे ४० × ५० चौरस फुटाचे लोखंडी अँगल्सच्या सहाय्याने केलेले अनधिकृत शेडचे बांधकाम काढण्यात आले.
ही कारवाई आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांच्या देखरेखीत, तसेच सहाय्यक आयुक्त (वर्तक नगर समिती) तनुजा रणदिवे, सहाय्यक आयुक्त (लोकमान्य प्रभाग समिती) सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आणि सहाय्यक आयुक्त (नौपाडा प्रभाग समिती) सोपान भाईक यांच्या उपस्थिती करण्यात आली.