श्रीनगर, 17 मार्च (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी आज, सोमवारी सकाळी एका जिहादी दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील जचलदाराच्या क्रुम्भुरा भागात ही चकमक झाली.
यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरेक्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जचलदाराच्या क्रुम्हुरा गावात वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.प रिसरात दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. जोरदार गोळीबार झाला. चकमकीत एका दहशतवादीचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले हे. या चकमकीदरम्यान एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. या चकमकीत दहशतवाद्याच्या मृतदेहाव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवादाविरुद्धच्या कारवाईबाबत सुरक्षा दल सतर्क आहेत.