अमरावती, 13 एप्रिल (हिं.स.)।
आष्टगाव ते खानापूर मार्गावर मालवाहू बोलोरो पलटी होऊन 1 ठार 9 मजूर गंभीर जखमी, दोन गंभीर जखमींना अमरावती रवाना
रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी एचजी इन्फो स्ट्रक्चर चे 10 मध्य प्रदेशातील मजूर चांदूर बाजार येथील एच जी च्या प्लांट वरून मोर्शी कडे घेऊन जात असताना खानापूर ते आष्टगाव जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू पिकअप क्रमांक एम एच 27 एक्स 8601 पलटी होऊन एक मजूर घटनास्थळी ठार झाला तर 9 मजूर जखमी झाले आहे. अपघात पाहण्यासाठी जमा झालेल्या नागरिकांनी एच.जी कंपनीची मालवाहू पिकअप खाली दबलेल्या मजुराला मालवाहू पिकअप सरळ करून अन्य 9जखमींना बाहेर काढले या अपघातात मध्य प्रदेशातील राकेश पाटील वय 22 वर्ष हा घटनास्थळी ठार झाला.
गंभीर जखमींचे नावे खालील प्रमाणे आहे पप्पू काजदे, वय 20 वर्ष, राजा काजळे यांना गंभीर मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी अमरावती रवाना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अन्य जखमींची नावे मुजा कासदे, सुनील कासदे, रंगभाऊ श्रीपाद यादव, सालक राम सालवे, लालसिंग कासदे, अर्जुन चिराले राहणार सर्व मध्यप्रदेश हे गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींवर मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सचिन कोरडे यांनी उपचार केले. वृत्तलिहे पर्यंत पोलिसात तक्रारीची नोंद नाही. अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे.