Team India : टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत घरच्या मैदानावर पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. या विजयासह सलग सातव्यादा वनडे मालिका जिंकण्याचा विक्रम टीम इंडयाने केला आहे. यंदाच्या आयसीसी विश्वचषकापूर्वी (ICC World Cup) भारताने घरच्या मैदानावर सलग दोन मालिका जिंकल्या आहेत. तत्पूर्वी, संघाने श्रीलंकेचा 3-0 असा व्हाईटवॉश केला. टीम इंडीयाने याआधी दोनदा मायदेशात सलग 6 एकदिवसीय मालिका जिंकल्या आहे. मात्र यावेळी हा विक्रम मोडीत काढत सलग 7 व्यांदा मालिका जिंकली.
टीम इंडयाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत 2019 च्या विश्वचषकानंतर मायदेशात एकही वनडे मालिका गमावलेली नाही. डिसेंबर 2019 मध्ये संघाने पदार्पण केले, जेव्हा संघाने वेस्ट इंडिजचा 2-1 ने पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि आता न्यूझीलंडला घरच्या मैदानात पराभूत केले.
यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक 2023 चे आयोजन भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्षाची शानदार सुरुवात करत श्रीलंका आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. विश्वचषकापूर्वी भारताला आता फक्त 10 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत, संघाने 5 सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. मार्चमध्ये संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.
डिसेंबर 2019 पासून 7 मालिका जिंकल्या
डिसेंबर 2019 पासून भारताने एकूण 7 एकदिवसीय मालिका जिंकली आहे. यापूर्वी संघाने 2016 ते 2018 दरम्यान एकूण 6 मालिका जिंकल्या होत्या आणि त्याआधी 2009 ते 2011 दरम्यान 6 एकदिवसीय मालिका जिंकल्या होत्या. यासह 2011 मध्ये भारतय संघ विश्वविजेताही ठरला होता.
अशी आहे विजयाची घोडदौड (डिसेंबर 2019 पासून)
- 2019-20- वेस्ट इंडिजचा 2-1 ने पराभव केला
- 2019-20- ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केले
- 2020-21- इंग्लंडला 2-1 ने पराभूत केले
- 2021-22- वेस्ट इंडिजचा 3-0 ने पराभव केला
- 2022-23- दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला
- 2022-23- श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला
- 2022-23- न्यूझीलंडविरुद्ध २-० अशी आघाडी