पुणे, 8 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उद्या, बुधवारपासून बेमुदत उपोषणावर बसणार आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेवरून त्यांनी हा उपोषणाचा इशारा दिला आहे. भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील देवस्थानाकडे जाणारा बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दूरवस्था झालेल्या रस्त्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ४ मार्च ला उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
मात्र, ३ मार्च रोजी पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील एक आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल असा शब्द दिला होता. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं उपोषण स्थगित केले होते. मात्र, पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दिलेले आश्वासनाची तारीख संपून गेली, तरी देखील या रस्त्याचे कोणतेही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ९ एप्रिलला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपोषणाला बसणार आहे, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिला आहे. ——————–