दिसपूर, 27 मार्च (हिं.स.)। कोलकाता नाईट रायडर्स संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली.या सामन्यात क्विंटन डिकॉकच्या साथीला सलामीला मोईन अली दिसून आला. मोईन अलीला कालच्या सामन्यात सुनील नरेनच्या जागी संघात घेण्यात आले होते. काल 1628 दिवसांनी पहिल्यांदा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सुनील नरेन याच्याशिवाय खेळत होता. त्यामुळे अनेकांचा आश्चर्याचा धक्का बसला.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य राहणे नाणेफेकीसाठी मैदानात आला तेव्हा त्याने सुनील नरेनच्या न खेळण्यामागचे कारण समोर आले. गुवाहाटीला झालेल्या या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजिंक्य राहणे याने प्लेईंग 11 मध्ये बदल केल्याचे सांगितले. सुनील नरेनच्या जागी मोईन अलीला संघात घेण्यात आल्याचे त्याने जाहीर केले. त्यामुळे सुरुवातीला चाहत्यांना नरेनला दुखापत झाली आहे का, अशी शंका वाटली. मात्र, सुनील नरेनची प्रकृती ठीक नसल्याने तो आजच्या सामन्यात खेळणार नाही, असे अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले.
सुनील नरेन हा केकेआरच्या संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. तो काल 1628 दिवसांनी पहिल्यांदाचा एखाद्या मॅचमध्ये खेळला नाही. मात्र, सुनील नरेनच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला. नरेनच्या जागी संघात समावेश करण्यात आलेल्या मोईन अली यानेही प्रभावी गोलंदाजी करत 4 षटकांत फक्त 23 धावा देऊन दोन गडी बाद केले. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा 151 धावावंर रोखण्यात केकआरला यश आले.राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्या सामन्यात हरल्याने ते गुणतालिकेत सर्वात तळाच्या स्थानावर आहेत. तर केकेआरने दोन गुण मिळवल्यामुळे त्यांनी 9 व्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर उडी घेतली आहे.