नाशिक, 4 एप्रिल (हिं.स.)।
– वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यास-ाठी पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवि-ली जाणार आहे. भद्रकाली परिसरातून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची सुरुवातही करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रा-तील कंपन्यांच्या सीएसआरच्या माध्यमातून काही सीसीटीव्ही बसविले जात आहे. असे असले तरी नागरिकांनी नेहमी सजग राहिले पाहिजे. तसेच कोणतीही घटना घडल्यास तात्काळ पोलि-सांकडे तक्रार दाखल करा असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ २ अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेले दुचाकी वाहने, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन, तसेच रोकड रक्कम असा सुमारे ८५ लाखांचा मुद्देमाल तक्रारदांच्या हाती मूळ मालकांना पोलिसांनी हस्तांतरण केला आहे. इंदिरानगर येथील आदित्य हॉल येथे मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. दरम्यान ज्या महिलांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यानंतर फिर्यादी महिला भगिनींना पोलिसांचे कौतुकास्पद मनोगत व्यक्त करताना त्यांना आपल्या सौभाग्याचे लेणेमिळाल्यामुळे अश्रू अनावर झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सचिन बारी तसेच सहाही पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली पाहिजे. तक्रार दाखल नसेल तर पोलिसांना तपास करण्यात मर्यादा येतात. त्यामुळे नागरिकांनी चोरी अथवा इतर कोणतीही घटना घडल्यास निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार केल्यास तपास करताना पोलिसांना त्याचा फायदा होऊनगुन्हेगारांना जेरबंद करता येते. पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय असायला हवा, सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख यांनी सांगितले.
एकूण ६० फिर्यादींना एकूण ८३ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल मूळ मालक फिर्यादींना हस्तांतरित करण्यात आला आहे. मुद्देमाल परत मिळाल्यानंतर फिर्यादी महिला भगिनींनी मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांना आपल्या सौभाग्याचे लेणे मिळाल्यामुळे अश्रू अनावर झाले. यावेळी पोलिसांची तत्परता अन डायल ११२ वर कॉल केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद याबाबत उपस्थिती त्यांनी कौतुक केले.