SSC Result : संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के; पाटील निकिता जगन्नाथ (97%) शाळेतून प्रथम
SSC Result : मुक्ताईनगर तालुक्याचा एकत्रित निकाल लागला आहे, तर शहरातील संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय,मुक्ताईनगर (S.M.V,Muktainagar) मध्ये इयत्ता १० वी (ssc) परीक्षेसाठी यंदा ६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी पूर्ण चे पूर्ण ६२ पास झालेले आहेत (ssc 10th pass results)
मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांनींनी गुणांची नव्वदी पार करून,तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी ८०% च्यावर उडी घेतल्याने शाळेने १०० टक्क्यांपर्यंत झेप घेतली आहे.
तर संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय,मुक्ताईनगर येथील १० वी मध्ये नेत्रदीपक यश संपादन करणारे प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी खालील प्रमाणे
प्रथम – निकिता जगन्नाथ पाटील (४८०) 97%
द्वितीय- जानव्ही रामभाऊ सोनार (४४९) 90.40%
तृतीय – दिव्या योगीराज पाटील (४४३) 89.20%

असा निकाल लागलेला असून या विद्यालयातील सर्व प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनींचे तसेच इतर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक एन डी काटे, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.