SSC Result : जे.ई.स्कूलचा दहावीचा निकाल 94 टक्के; पाटील प्रणवसिंग सरदार (98%) तालुक्यातून प्रथम
SSC Result : मुक्ताईनगर तालुक्याचा एकत्रित निकाल लागला आहे, तर शहरातील जगजिवनदास इंग्लिश स्कूल,मुक्ताईनगर (J.E.School,Muktainagar) मध्ये इयत्ता १० वी (ssc) परीक्षेसाठी यंदा ४०६ विद्यार्थी परिक्षला बसले होते. पैकी ३७९ पास झालेले असून २७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. (ssc 10th pass results)
मुक्ताईनगर तालुक्यातून असंख्य विद्यार्थ्यांनी गुणांची नव्वदी पार करून ९८ टक्क्यांपर्यंत झेप घेतली आहे.
तर जे. ई स्कूल,मुक्ताईनगर येथील १० वी मध्ये नेत्रदीपक यश संपादन करणारे प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी खालील प्रमाणे
प्रथम – पाटील प्रणवसींग सरदार (४८३+७) 98%
द्वितीय- कोळी ऋषिकेश संजय (४८४+५) 97.80%
तृतीय – पाटील साईप्रसाद जिवनसिंग (४८३+५) 97.60%
तृतीय – गायकवाड भूमिका विनोद (४८१+७) 97.60%
असा निकाल लागलेला असून सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे तसेच आ. एकनाथ खडसे , उपाध्यक्ष नारायण चौधरी , सचिव डॉ. सी.एस.चौधरी आणि प्राचार्य आर. पी.पाटील यांनी अभिनंदन केले आहे
मुक्ताईनगर तालुक्यातून 98% गुण घेवून प्रथम आलेला, पाटील प्रनवसिंग सरदार हा विद्यार्थी प्रभाग क्र.१२ शिवरायनगर येथील रहिवासी तसेच संत मुक्ताबाई माध्यमिक शाळेचे कारकून (क्लार्क) श्री.सरदारसिंग पाटील यांचा सुपुत्र आहे.
सर्वच विद्यार्थ्यांचे गुणपत्रक गुणांनी भरल्याने विद्यार्थ्यांचा अकरावी विज्ञान शाखेकडे सर्वाधिक कल असणार आहे. वाणिज्य व कला शाखेकडे सुमार ओढा आहे. पॉलिटेक्निककडे अनेक विद्यार्थ्यांचा ओढा असून अनेकांनी सुट्टीतच महाविद्यालये देखील निवडल्याचे चित्र आहे.