पुणे, 9 एप्रिल (हिं.स.)।मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्याहून नागपूर व दिल्लीसाठी (हजरत निझामुद्दीन) विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूर व दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
पुणे – नागपूर – पुणे वातानुकूलित रेल्वे
– गाडी क्रमांक (०१४३९) १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान पुण्याहून दर शनिवारी रात्री सात वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी नागपूरला दुपारी दोन वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.- गाडी क्रमांक (०१४४०) १३ एप्रिल ते २५ मे दरम्यान दर रविवारी नागपूर येथून दुपारी चार वाजून १५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून २० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.
पुणे – हजरत निजामुद्दीन – पुणे वातानुकूलित रेल्वे
– गाडी क्रमांक (०१४४१) १५ एप्रिल ते २७ मे दरम्यान दर मंगळवारी पुण्याहून दुपारी साडेपाच वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांनी हजरत निझामुद्दीन येथे पोहोचेल.- गाडी क्रमांक (०१४४२) १६ एप्रिल ते २८ मे दरम्यान दर बुधवारी हजरत निझामुद्दीन येथून रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. ही गाडी रतलाममार्गे धावणार आहे.