Shukrawar Che Upay: ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांचा व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव असतो. प्रत्येक ग्रहाचे आपले एक वैशिट्य आहे. यात शुक्र ग्रहाला (Shukra Grah) प्रभावशाली ग्रह मानले जाते. प्रेम संबंध आणि सुखी वैवाहिक जीवनाचे कारक म्हणून शुक्रग्रहाकडे बघितलं जात. कुंडलीत शुक्रदोष (Shukra Dosh) असल्यास अनेकदा पती-पत्नीच्या नात्यामध्ये किरकोळ वाद होतात. एखाद वेळेस हा वाद टोकाला जातो. आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. तुमच्याही जीवनात ही समस्या असेल तर ही माहीती तुमच्यााठी फयद्याची ठरु शकते. या लेखात आम्ही तुम्हाला शुक्रवारचे काही उपाय सांगणार आहोत. शुक्रवारच्या या उपायांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता येईल.
करा हे उपाय
शुक्र मंत्राचा जप
कुंडलीतील शुक्र दोष दूर करण्यासाठी शुक्रवारी ‘द्रां द्री द्रौ सः शुक्राय नमः’ या शुक्र बीज मंत्राचा 108 वेळा जप करावा. शुक्र ग्रह हे सुंदरतेचे प्रतिक आहे. हा जप केल्याने शारीरिक सुंदरतेसह तुमच्या स्वभावात देखील गोडवा येईल.
पांढरे फूल
प्रेम व सुखी वैवाहिक जीवनाचे कारक असलेल्या शुक्र देवाला पांढरा रंग प्रिय आहे. त्यामुळे सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात पांढऱ्या रंगाचे फुल टाकावे. यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होत शुक्र ग्रह संबंधित दोष दूर होतात. या उपायामुळे प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.
अत्तर खरेदी करा
जर तुमच्या वैवाहिक जीवनात खूप चढ उतार येत असतील तर शुक्रवारी एखादं चांगले अत्तर खरेदी करा. हे अत्तर पती आणि पत्नी दोघांनी लावावे. हा उपाय तुमच्या दोघांमधील मतभेद दूर करण्यासाठी उपयोगी ठरेल. कारण शुक्र देवाला सुगंधी वस्तूंची आवड आहे.
लव बर्ड
वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण करण्यात बेडरूमच्या सजावटीची भूमिका महत्त्वाची ठरते. जर पती पत्नीमधे बऱ्याच दिवसांपासून वाद असेल आणि ही परिस्थिती बदलवायची असेल तर बेडरूममध्ये लव बर्डचे फोटो लावले पाहीजे.
या वस्तुंचे करा दान
शुक्रवारी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला चांदी, तांदूळ, मिश्री, पांढरे कपडे, दही, पांढरे चंदन या वस्तूंचे दान करावे. हे दान तेव्हा करा जेव्हा तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद झाला असेल. यामुळे वाद नाहीसा होत वैवाहिक जीवन सुखी होते.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत असून muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)