अमरावती, 20 मार्च (हिं.स.)।श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्काराचे वितरण शनिवार दि.२२ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात येणार असून या समारंभात केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांना प्रतिष्ठेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२४’ ने सन्मानित करण्यात येणार आहे.रु. पाच लक्ष रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विदर्भातील दोन उत्कृष्ट शेतकरी महिलांनाही या सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शनिवार दि.२२ मार्च २०२५ ता सकाळी साडेदहा वाजता संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन प्र. देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून मा. खासदार शरदचंद्र पवार हे प्रमुख अतिथी म्हणून आभासी पद्धतीने उपस्थित राहतील. राज्यसभा सदस्य खा. डॉ. अनिल बोहे, अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे आणि अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके हे या सोहळ्याला अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
या सोहळ्यात मा. खासदार शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेल्या दाननिधीतून विदर्भातील उत्कृर सेतकरी महिलेला ‘शारदाबाई पवार उत्कृश महिला शेतकरी पुरस्कार २०२४ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्कार २०२४’ असे दोन पुरस्कार उत्कृष्ट महिला शेतक-यांना दिल्या जाणार आहेत. रोख रु.१.११.१११/- (रुपये एक लक्ष अकरा हजार एकयो अकरा), स्मृतिचिन्ह, सन्मान केंद्र सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती प्रीत्यर्थ प्रसारित केलेले १२५ रुपयांचे नाणे, साठी, चोली, शाल व श्रीफळ असे शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्काराचे स्वरूप आहे तर रु.५१०००/- रोख, स्मृतिचिन्ह, साडी, चोळी, शाल व श्रीफळ असे ‘श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्काराचे स्वरूप आहे. विदर्भातील महिला शेतक-यांसाठीचा हा सर्वात मोठा सन्मान आहे.
श्रीमती विमलाबाई देशमुख (वैद्यकीय शिक्षण) अभ्यास क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले शिक्षण अभ्यासवत्ती आणि माध्यमिक शाळेतील खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनीला क्रीडासंगातील उल्लेख प्राविण्याबद्धल ‘डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्कार देखील या सोहळ्या प्रदान करण्यात येईल.पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थेचे उपाध्यक्ष सर्व श्री.क गजानराव पुडकर, अॅड. के.जी. पा पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्य श्री. दिलीपबाबू इगोले, कार्यकारि सदस्य सर्व श्री. हेमंत काळमेघ, प्राचां केशवराव गावडे, सुरेशराब खोट प्रा. सुभाषराव बनसोड, स्वीकृत सदा सर्व श्री. प्राचार्य डॉ. अंबादास कुन्द नरेशचंद्र पाटील, डॉ. पी. एस. वायार डॉ. अमोल महल्ले हे प्रामुख्याने उपस्थि राहणार असून या सोहळ्याला नागरिकों मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती संस्थेचे सचिव डॉ.वि.गो.ठाकरे यांनी केली आहे.