नाशिक, 25 मार्च (हिं.स.)।
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री काळाराम मंदिरात चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी वासंतिक नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. यंदा हा नवरात्रोत्सव रविवार (दि.३०) मार्च ते शनिवार (दि.९) एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या नवरात्रोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना भाविकांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काळाराम मंदिर विश्वस्त मंडळाने केले आहे.
या नवरात्रोत्सवात दैनंदिन कार्यक्रमात पहाटे साडेपाच वाजता श्रींची काकड आरती, सकाळी साडेआठ वाजता मंगल आरती, सकाळी १० वाजता माध्यान्ह पूजा, हभप नंदकुमार जोशी यांचे कीर्तन, दुपारी १ वाजता अध्यात्म रामायण संहिता पारायण, भागवतकार हभप. नरेश पूजारी, यजुर्वेद संहिता पठण-विविध वैदिक पाठशाळा, नाशिक, विविध भजनी मंडळाची भजने, सायंकाळी साडेसात वाजता शेजारती केली जाणार आहे. वासंतिक नवरात्रोत्सवात रोज सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्याने आयोजित करण्यात आली असून,
रविवार (दि.३०) महोत्सवाचे उद्घाटन समारंभात प्राजक्त भट, गीतरामायण – भरतनाट्यम नृत्याविष्कार सोमवार (दि.३१) ( श्री गुरुमाई मॉ. रुद्रत्मिका) डॉ.अनुजा जानवेलकर यांचे आत्माराकडे नेणारा राजमार्ग – क्रियायोग या विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवार (दि.१) डॉ.दत्तात्रय तापकीर ( पुणे ) यांचे अध्यात्माची गंगा आणि विज्ञानाची यमुना या विषयावर व्याख्यान होणार आहे.बुधवार (दि.२) दिपाली श्रीराम केळकर ( अभंग लावण्य ) गुरुवार (दि.३) रोजी पौर्णिमा ग्रुप ( सुंदरकांड ) सादर करणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष, श्री काळाराम संस्थान, नाशिक तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक मनिलकुमार लोकवानी विश्वस्त मंडळ, धनंजय पुजारी, मंगेश पुजारी ,नरेश पुजारी, मंदार जानोरकर डॉ. एकनाथ कुलकर्णी अँड.दत्तप्रसाद (अजय) निकम अँड. दिलीप रंगनाथराव कैचे, सी.ए. शुभम मंत्री शांताराम अवसरे, मिलिंद तारे या वर्षाचे मानकरी श्री. हेमंतबुवा अनंत पुजारी, वंशपरंपरागत पूजाधिकारी यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम ( रात्री ८ ते १० )
उत्सव कालावधीत रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार ( दि.३०) मीना परुळकर- निकम, प्रियांका कोठावदे ( भक्तीरंग) सोमवार (दि.३१) पूजा गायतोंडे, जर्मनी ( भक्तिधारा )मंगळवार (दि.१) सुरज बारी, ओंकार कडवे, आलिशा निमोणकर श्रावणी गीते,अमोल कुलकर्णी, वैष्णवी पगारे ( नाशिकचे उगवते सुर)बुधवार (दि.२) रोहित जंजाळे केशव (केशव कथक नृत्यालय)- ( नृत्याविष्कार )पल्लवी पटवर्धन व सहकारी ( अवघा रंग एकची झाला ) गुरुवार (दि.३) अजित कडकडे ,मुंबई ( गायन )शुक्रवार (दि.४) पंडित डॉ.अविराज तायडे ( अभंगवाणी ) शनिवार (दि.५) श्रुतिका शुक्ल त्र्यंबकेश्वर , असावरी खांडेकर (चैत्रस्वर ) सोमवार (दि.७) सायंकाळी ५:३० , सुमुखी अथणी कीर्ती भवाळकर अदिती पानसे (राम रंगीले – श्रीराम परिक्रमा )
विशेष कार्यक्रम
सोमवार (३१) संकेत बरडीया आणि गिटार वर्ल्ड विदयार्थी सामुहिक रामरक्षा संचलन- वे.शा.सं. श्री. भालचंद्र शौचे व पुजारी परिवार युवा वर्ग.सकाळी ६.३० वाजता सकाळी ७.०० बुधवार ( दि.२) तुलसी अर्चन सकाळी ७.३० शुक्रवार ( दि.४) सप्तमी महाप्रसाद दुपारी १२.०० रविवार ( दि.६ ) दुपारी रामनवमी जन्मोत्सव, सायंकाळी ७ वाजता अन्नकोट महोत्सव, सोमवार दि.७) श्रीराम यागसकाळी ७.३० ,मंगळवार ( दि.८) श्रीराम व श्री गरुड रथ यात्रा दुपारी २.३० बुधवार ( दि.९) उत्सव समाप्ती-मंत्रजागर- गोपालकाला सायंकाळी ७ वाजता.